लहान मुलं फार गोंडस, गोड, सोज्वळ असतात. त्यांच्यात निरागसता प्रचंड प्रमाणात असते. लहान मुलांप्रमाणे त्यांचे कपडे, खेळणी आणि चप्पलही क्युट असतात. बरेच लहान मुलं कमी वयात चालायला सुरुवात करतात. आपले मुल धडपडत चालत असलेलं पाहून, पालक खुश होतात, व त्यांच्या पायात चप्पल आणून घालतात.
लहान मुलांचे चप्पल आकर्षक असतात. पण लहान मुलांच्या पायात लवकर चप्पल घालू नये असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे कोणत्या वयात मुलांना चप्पल घालावे? लहान वयात मुलांना चप्पल का घालू नये? याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉक्टर माधवी भारद्वाज यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे(How old baby can wear slippers?).
मुलांनी शूज-चप्पल घालावे का?
डॉ.माधवी भारद्वाज यांच्या मते, 'लहान मुलांना शूज-चप्पलची गरज नसते. आजकालचे पालक त्यांच्या आवडीनुसार, मुलांना स्टायलिश डिझायनर शूज-चप्पल घालतात. पण खरंच मुलांना या चप्पालांची गरज आहे का? कारण मुलांना कसे चालायचे हे ही ठाऊक नसते, मग मुलं या स्टायलिश चप्पालांचे करणार काय? जर आपण आपल्या मुलांच्या पायात लहानपणापासून शूज-चप्पल घालत असाल तर, त्यांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकते.'
मुलं मोबाइल पाहतच जेवतात? जेवताना मोबाइल पाहण्याची सवय कशी तोडाल, आणि नाहीच तुटली तर..
लहान मुलांना चप्पल का घालू नये?
शरीरातील प्रत्येक अवयवाचे स्थान हे निश्चित असते. पायांचीही तेव्हाच वाढ होते, जेव्हा त्यावर विविध प्रकारचे सेंसिस स्टीमुलेट होते. लहान मुलांना पायांद्वारे काय गरम, काय थंड, काय स्लीपरी आहे, या सगळ्या गोष्टी समजून येतात. जेव्हा हे सगळे सिग्नल मेंदूपर्यंत पोहचतात, तेव्हाच पायांची योग्य वाढ होते. जर आपण लहान वयातच मुलांना चप्पल किंवा शूज घालत असाल तर, या सगळ्या गोष्टी मुलांना अनुभवता येणार नाही. ज्याचा त्याच्या एकूण वाढीवरही परिणाम होऊ शकतो.
मुलांना अनवाणी चालायला शिकवा
तज्ज्ञांच्या मते, मुलांनी अनवाणी चालायला शिकायला हवे. पण अनवाणी चालताना योग्य काळजी घ्यायला हवी. कारण अशा वेळी नाजूक पायाला दुखापत होणे, पाय घाण होण्याची शक्यता वाढते. पण पालकांनी मुलांबाबतीत अति ओव्हर प्रोटेक्टिव्ह होण्याची गरज नाही. त्याला विविध गोष्टी एक्सप्लोर करू द्या.
वजन कमी करायचं, पण व्यायाम-डाएट फॉलो होत नाही? झोपताना न चुकता करा १ सोपा उपाय, झरझर घटेल वजन
मुलं शरीराचे संतुलन राखण्यास शिकतात
अनवाणी चालल्याने मुलं आपल्या शरीराचे संतुलन राखण्यास शिकतात. याशिवाय त्यांच्या पायाची ग्रीप मजबूत होते. जर आपण लहान मुलांना चप्पल किंवा शूज घालत असाल तर, त्यांना त्यांच्या शरीराचे बॅलेंस राखण्यास अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे मुलं उशीराही चालायला शिकतात.
लहान मुलांना शूज घालण्याचे योग्य वय
जेव्हा लहान मुलं आपल्या गुडघ्यावर रांगायला लागतात. त्या वयात आपण त्यांना शूज किंवा चप्पल घालून चालायला शिकवू शकता. साधारण ६ महिन्यांत मुलं गुडघ्यावर चालायला शिकतात. यानंतर, मुलं चालायला लागताच. या वयात आपण त्यांच्या पायात चप्पल-शूज घालून चालायला शिकवू शकता.