लहान मुलांचा आहार हा अनेक पालकांसाठी आणि विशेषत: मुलांच्या आईसाठी एक चिंतेचा विषय असतो. कारण मुलं व्यवस्थित जेवण करत नाहीत, असं बहुतांश पालकांचं म्हणणं आहे. क्वचित काही अपवाद सोडले तर बरेच मुलं अजिबात व्यवस्थित जेवत नाहीत. शाळेत दिला जाणारा भाजी- पोळीचा डबाही पूर्ण संपवत नाहीत. शिवाय शाळेतून घरी आल्यानंतर वरण- भात, भाजी- पोळी असा त्यांचा चौरस आहार नसतो. याचा परिणाम आपोआपच त्यांच्या तब्येतीवर, अभ्यासावर, मानसिक स्वास्थ्यावर होतो. म्हणूनच पालकांनी मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देऊन त्यांना व्यवस्थित जेवण करण्याची सवय लावली पाहिजे (How To Improve Eating Habits Of Kids?). यासाठी पालकांची भुमिका नेमकी कशी असावी, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेली ही खास माहिती...(What are ideal foods for kids?)
मुलांचा आहार कसा असावा?
१. बहुतांश पालक मुलांना जेवायला देताना एक मोठी चूक करतात आणि ती चूक म्हणजे मुलांची भूक लक्षात न घेता त्यांना जेवायला देणे. मुळात पालक असो किंवा मुलं असो जेवणाची वेळ ही आपली बॉडी क्लॉक पाहून ठरवली पाहिजे.
मुळ्यापेक्षाही जास्त गुणकारी आहे मुळ्याचा पाला! चुकूनही फेकू नका- 'या' पद्धतीने खा- होतील ५ फायदे
म्हणजेच शरीराला जेव्हा गरज वाटेल तेव्हाच जेवलं पाहिजे. पण आपण वॉल क्लॉक पाहून जेवण करतो. हे मुलांच्या बाबतीत करू नका. मुलांनी जेवायला मागितल्यावरच त्यांना जेवायला द्या. जी मुलं जेवायला मागतच नाहीत किंवा ज्यांना भूकच लागत नाही, त्यांच्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
२. काही मुलं पदार्थ पाहून भूक ठरवतात. पण हे चुकीचं आहे. मुलांनी प्रत्येक पदार्थ सारख्याच आवडीने खाल्ला पाहिजे. आवडत नसले तरी शरीराची गरज म्हणून काही पदार्थ मुलांनी खायलाच हवेत. मुलांनी नावडता पदार्थ खायला नकार दिला की पालक त्यांच्या आवडीचे पदार्थ करून देतात किंवा विकत मागवतात. ही सवय सोडा. मुलांना जे घरात तयार आहे, तेच खाण्याची शिस्त लावा. सुरुवातीला त्रास होईल, मुलं हट्टीपणा करतील, उपाशी राहतील. पण हळूहळू त्यांना सवय होईल आणि घरातले अन्न न कुरकुरता खातील.
हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? डॉक्टर सांगतात ५ सोपे उपाय, ॲनिमियाचा त्रास कमी होईल
३. ऋतूनुसार आहार देणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ऋतूनुसार मुलांना फळं, भाज्या खाऊ घाला. आता थंडीच्या दिवसात डिंक, सुकामेवा खाणं ही शरीराची गरज आहे. मुलांना हिवाळ्यात या सगळ्या गोष्टी द्या. असंच प्रत्येक ऋतूनुसार जर मुलांनी आहार घेतला तर मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल.