मागच्या काही वर्षांपासून मुलांच्या शाळांचा वेळ खूप वाढला आहे. सकाळी ८ वाजेच्या आसपास घराबाहेर पडणारे मुलं थेट दुपारी ३ ते ४ दरम्यान घरी परत येतात. शाळेतला सगळा ताण झेलून घरी आल्यानंतर मुलांना खरोखरच काही वेळ त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे घालवावा वाटतो. त्यावेळी त्यांना कोणताही ताण नको असतो. पण नेमकं इथेच चुकतं आणि पालक मुलांच्या काळजीपोटी किंवा प्रेमापोटी अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे मुलं रिलॅक्स व्हायचं सोडून आणखीनच तणावात येतात. तुमच्याकडूनही नकळत त्या काही गोष्टी होत आहेत का? हे एकदा तपासून पाहा. (how do parents react when kids come home from school?)
मुलं शाळेतून घरी आल्यानंतर पालकांनी काय करू नये?
मुलं जेव्हा थकून भागून शाळेतून घरी येतात तेव्हा पालकांची भूमिका नेमकी कशी असावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तज्ज्ञ सांगतात की मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा आल्या आल्या त्यांच्यावर कधीच प्रश्नांचा भडिमार करू नका.
वेटलॉससाठी हृतिक रोशनच्या बहिणीने सगळ्यात आधी केली 'ही' गोष्ट, सुनैनासारखं फिट व्हायचं तर....
आज शाळेत काय झालं, शाळेतला अभ्यास केलास का? खूप होमवर्क दिला आहे, डब्बा सगळा संपवलास का असं काहीही त्यांना विचारू नका. यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर निगेटिव्ह असेल तरी त्याचा मुलांना लगेच ताण येतो. ती गोष्ट तर आठवतेच, पण त्यासोबतच आता आपली आई किंवा बाबा त्यासाठी आपल्यावर चिडेल का, ओरडतील का, असंही वाटू लागतं. त्यामुळे हे प्रश्न विचारण्याऐवजी पालकांनी काय करायला पाहिजे, ते पाहा..
मुलं शाळेतून घरी आल्यावर पालकांनी काय करावं?
मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात, तेव्हा अगदी आनंदाने मनापासून हसून त्यांचं स्वागत करा. तुम्ही कितीही घाईत असलात तरी त्या वेळेपुरतं तुमचं काम बाजूला ठेवा आणि मुलांसाठी वेळ काढा.
तुम्ही खाल्ली का वर्षातून एकदाच मिळणारी 'खजला' मिठाई? वाचा उत्तरप्रदेशच्या मिठाईची रंजक कहानी...
प्रेमाने त्यांना जवळ घ्या आणि ते शाळेत गेल्यानंतर तुम्ही त्यांना किती मिस करत होतात, ते सांगा. त्यानंतर त्यांना कपडे बदलायला, बूट- सॉक्स, दप्तर, डबा, पाण्याची बाटली हे सगळं जागेवर ठेवायला जरूर सांगा. पण थोडा वेळ जाऊ दे. त्यांना कपडे बदलायला लावून थोडं रिलॅक्स होऊ द्या. काहीतरी खायला द्या. मग पोटात गेल्यानंतर आपोआपच ते मोकळं बोलू लागतील. त्यानंतरच मग शाळेतल्या एकेक गोष्टी विचारा..