काळ बदलला की सर्व काही बदलतं. जसजसं वय वाढतं, तसतसं दिसण्यापासून, व्यक्तिमत्त्वापर्यंत आणि विचारांमध्येही बदल होतात (Parenting Tips). आपण पाहिलं असेल आई - वडिलांचं मुलांसोबत जमत नाही. मुलांच्या आधुनिक विचारांना पालक पटवून घेत नाहीत (Mental Health). कारण त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप असतं.
पालक मुलांच्या नव्या विचारांना समजून घेत नाहीत. यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढतच जातो. समजून न घेणे, मुलांचे म्हणणे ऐकून न घेणे यामुळे नात्यातील दुरावा वाढतो. अशा स्थितीत पालकांनी स्वत:मध्ये बदल करून नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. पालकांनी मनावर घेतलं तर, जनरेशन गॅप सहज दूर होऊ शकतं(How to Be a Calmer Parent And Stop Arguing With Your Kids).
मोकळ्या मनाने विचार करा
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, 'माणसाने नेहमी नव्या गोष्टी आणि नव्या विचारांचा आदर ठेवायला हवे. पालकांनी मुलांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, पण त्यांच्यावर आपले विचार लादू नये. त्या विचारांवर मुलांचे म्हणणे ऐकून घ्या. नंतर त्यावर आपले मत मांडा. त्यांच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे समजावून सांगा.
वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..
मुलांशी मनमोकळेपणाने बोला
काही मुलं पालकांसोबत काही गोष्टी शेअर करण्यास घाबरतात. अभ्यास, डेटिंग, प्रेमविवाह किंवा इतर अशा अनेक गोष्टी असतात, जे मुलं पालकांसोबत शेअर करीत नाहीत. अशावेळी मुलं इतरांसोबत या गोष्टी शेअर करतात, आणि मग इतर लोकं योग्य सल्ला देतीलच असे नाही. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत मनमोकळेपणाने बोलयला हवे.
मुलांना ओरडू नका
चूक प्रत्येकाकडून होते. मुलांनी चूक केली तर, त्यांना ओरडू नका. मुलांची बाजू समजून घ्या. त्यांना आपले मत व्यक्त करण्याची संधी द्या.
वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय
समजून घेण्याचा प्रयत्न करा
पालकांनी मुलांना समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. कधीकधी मुलांना जे करायचे आहे ते करू दिले पाहिजे. पालक आपले विचार मुलांवर लादतात. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली पाहिजे.