Lokmat Sakhi >Parenting > शिस्त लावणाऱ्या प्रेमळ आईचे ८ गुण; न ओरडता मुलांना शिस्त लागेल, होतील चांगले संस्कार

शिस्त लावणाऱ्या प्रेमळ आईचे ८ गुण; न ओरडता मुलांना शिस्त लागेल, होतील चांगले संस्कार

How To Be A Good Mother : आपण नेहमी आपल्या मुलांना उत्तम संस्कार  द्यावेत, उत्तम आई बनावं असं प्रत्येक आईला वाटतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:18 PM2024-02-06T13:18:21+5:302024-02-06T14:00:12+5:30

How To Be A Good Mother : आपण नेहमी आपल्या मुलांना उत्तम संस्कार  द्यावेत, उत्तम आई बनावं असं प्रत्येक आईला वाटतं.

How To Be A Good Mother : How to Be a Good Mother Instead Of A Perfect One | शिस्त लावणाऱ्या प्रेमळ आईचे ८ गुण; न ओरडता मुलांना शिस्त लागेल, होतील चांगले संस्कार

शिस्त लावणाऱ्या प्रेमळ आईचे ८ गुण; न ओरडता मुलांना शिस्त लागेल, होतील चांगले संस्कार

मुलांना जन्म देणं वेदनादायक आणि सुखावह दोन्ही स्वरूपात असते तसंच मुलांचे पालनपोषण करणंही महत्वाचं असतं. महिला गर्भावस्थेपासूनच आपल्या मुलाच्या आरोग्याबद्दल विचार करू लागतात आणि मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असतात.(How to Be a Good Mother Instead Of A Perfect One) आपण नेहमी आपल्या मुलांना उत्तम संस्कार  द्यावेत, उत्तम आई बनावं असं प्रत्येक आईला वाटतं.  आपल्या मुलांच्या पालनपोषणात आपण कमी पडू नये असं प्रत्येक आईला वाटतं. (How To Be A Good Mother) त्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.

१) मुलांच्या संगोपनासाठी त्यांना आधी व्यवस्थित समजून  घ्या.   प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि कमजोरी असते ते समजून घ्या.   तुम्हाला कोणत्याही गोष्टींबद्दल संकोच वाटू  देऊ नका. मुलांशी मनमोकळे पणाने बोला.

२) आईला सुपरवूमन असं मानलं जातं. आईचं आणि मुलांचे नात भावनात्मकदृष्ट्या घट्ट होण्यासाठी, मुलांच्या आनंदात-दुखात सहभाग घेण्यासाठी आईने स्ट्राँग असायला हवं. शारीरिक, मानसिक आरोग्यही मजबूत होते. 

३) नेहमी समजदार आई बना. मुलांना नेहमी असं वाटतं की आईने आपलं ऐकावं.  विचार, भावनांना ऑब्जर्ब करा.  जर आई मुलांच्या गोष्टी इग्नोर करत झाल्या त्यांना अजिबात आवडत नाही.

४) मुलांशी चांगले रिलेशन ठेवण्यासाठी आई वडीलांनी नम्रतेने वागावे लागेल.  आई-वडीलांकडून चुका होऊ शकतात. पण अशा चुका टाळण्यासाठी  आधी स्पष्ट बोला. आपली चूक झाल्यानंतर माफी मागणे, मुलांसमोर चांगले उदाहरण प्रस्तृत करा.

५) एक चांगली आई नेहमी सपोर्टिव्ह असते.  मुलं कोणताही निर्णय घेतात तेव्हा तेव्हा आई वडीलांचा पाठिंबा अपेक्षित असते.  हे नुकसान टाळण्यासाठी आई वडीलांनी त्यांना चुक, बरोबर नेहमी समजावून सांगायला हवं.

जेवण कधी आणि कसं करावं? रामदेव बाबा सांगतात जेवणाचे १० बेसिक नियम,आजार दूर-फिट राहाल

६) मुलांना नेहमी सन्मान द्यायला शिका. मुलांचा तुम्ही आदर केला तरच ते तुमचा आदर करतील आणि कधीच उलट बोलणार नाहीत.

७) मुलांचे म्हणणे ऐकून घ्या. एक कूल आई आपल्या मुलांचे सगळे म्हणणं ऐकून घेते आणि त्यांच्या बोलण्यावर लक्ष देते. काही मुलांची ऐकण्याची क्षमता कमी असते. अशावेळी त्यांना समजावून सांगा.

मुलं हट्ट करतात-ऐकतच नाहीत? सुधा मुर्ती सांगतात वयात येणाऱ्या मुलांशी 'असं' वागा; आपोआप शिस्त लागेल

८) मुलांना लहानपणापासून त्यांची काम स्वत: करायला शिकवा. कारण नेहमीच ते तुमच्यावर अवलंबून राहीले तर त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही. 

Web Title: How To Be A Good Mother : How to Be a Good Mother Instead Of A Perfect One

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.