Join us  

मुलांवर सतत ओरडता, बाहेरचा सगळा राग त्यांच्यावर निघतो? अशाने मुलं तुमच्यापासून तुटली तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 12:30 PM

How To Be clam and not shouting on kids all the day parenting tips : सतत चिडचिड करुन किंवा राग करुन काहीच साध्य होणार नसते…

आपल्या मुलांवर आपलं जीवापाड प्रेम असतं, त्यांना आपण खूप जपतो. त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांनी भरपूर शिकावं, मोठं व्हावं यासाठी आपण जीवाचा अकांत करत असतो. त्यांनी काही कमी पडू नये म्हणून दिवसभर नोकरी करुन आपण त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळे करताना आपली खूप ओढाताण होत असते. ऑफीसमधल्या गोष्टी, घरातील ताणतणाव, सामाजिक गोष्टींचे प्रेशर हे सगळे आपल्याला कधीतरी असह्य होते आणि त्याचा राग कळत-नकळत मुलांवर निघतो. मूल आपल्याला काहीतरी विचारत असतं, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतं आणि आपण मात्र आपल्याच नादात असतो. अशावेळी आपण मुलांवर विनाकारण ओरडतो (How To Be clam and not shouting on kids all the day parenting tips). 

आपण त्यांच्या मनासारखे करत नसल्याने किंवा त्यांना वेळ देत नसल्याने मुलं चिडतात आणि आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करतात. मग तर आपण त्यांच्यावर आणखीनच चिडतो. प्रसंगी आपला आवाज तर चढतोच पण काही वेळा हातही उगारला जातो. असं करणं मुलांच्या वाढीच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. आपल्याला आपले ताण मॅनेज होत नाहीत यात मुलांचा काहीच दोष नसतो. मात्र ते आपल्या ताणाचा बळी होतात आणि मग परिस्थिती बिघडते. असे होऊ नये म्हणून पालक म्हणून आपण विशेष काळजी घ्यायला हवी. सतत चिडचिड करुन किंवा राग करुन काहीच साध्य होणार नसते तर योग्य वेळी योग्य पद्धतीने गोष्ट हाताळली तर परिस्थिती आनंदी राहण्यास मदत होते. यासाठी आपण नेमकं काय करायला हवं पाहूया...  

तुम्हीही फ्रस्ट्रेटेड मदर असाल तर...

(Image : Google)

अनेकदा आईवर फ्रस्ट्रेटेड असा टॅग एकतर त्या आईकडून स्वत:च किंवा तिच्या आजुबाजूच्यांकडून लावला जातो. पण ती अशी वैतागलेली का आहे हे मात्र कोणालाच समजून घ्यायचे नसते. आई असणाऱ्या महिला कायम वैतागलेल्या का असतात यामागील कारणं समजून घेणे आणि त्यानुसार त्यांचा वैताग कमी होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. अनेकदा महिलांना झेपत नाही-लहान मूल आहे तर नोकरीची काय गरज, झेपत नव्हतं तर मूल जन्माला घालताना विचार करायचा होता अशा स्वरुपाचे टोमणे ऐकवले जातात. मात्र असे करण्याआधी यामागील कारणं समजून घेऊया...

काय आहेत फ्रस्ट्रेटेड मदर असण्यामागची कारणं...

१. मी टाईमसाठी सुरु असणारा संघर्ष - आधी आपल्याला स्वत:साठी थोडा का होईना वेळ मिळत असतो मात्र बाळ झाल्यावर सतत बाळाचे करता करता आपल्याला स्वत:साठी अजिबात वेळ मिळत नाही आणि मग आपली चिडचिड व्हायला लागते. 

२. सतत कोणीतरी जज करणं आणि मिळणारे सल्ले - मुलीची आई झाली की तिला सतत आजुबाजूच्यांकडून विनाकारण जज केलं जातं. याचं त्या आईवर एकप्रकारचे प्रेशर येते. इतकेच नाही तर तिला सतत काही ना काही सल्ले दिले जातात. यामुळे ती नव्याने आई झालेली महिला वैतागू शकते. 

३. परफेक्ट आई असण्याचे प्रेशर - आपण सगळ्याच रोलमध्ये परफेक्ट असावं असं बहुतांश महिलांना वाटत असतं. त्यातही आपण परफेक्ट आई असावं असं महिलांना कायम वाटतं. म्हणून सगळ्या गोष्टींचा अट्टाहास करता करता त्या पार थकून जातात.

४. करिअर आणि मूल यातील निवडीबाबत असणारा गिल्ट - साधारण ६ ते ८ महिने झाले की महिला कामावर रुजू होतात. दिवसाचे ८ ते १० तास घराबाहेर राहावे लागणार असल्याने आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही हा गिल्ट त्या आईच्या मनात सतत निर्माण होत असतो. 

मात्र या सगळ्या गोष्टींवर शांतपणे नीट विचार करुन आपल्या डोक्यात त्याबाबत स्पष्टता असेल तर आपल्याला त्याचा इतका त्रास होत नाही. इतकेच नाही तर या सगळ्याच्या त्रास झाल्याने आपला सतत रागराग आणि चिडचिड होत नाही. आणि मग नकळत मुलांसोबत जो वेळ मिळतो तो आपण त्यांच्यासोबत अतिशय आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यावर सतत ओरडत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केला नाही तर आपले आयुष्या नक्कीच सोपे होऊ शकते.  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं