Lokmat Sakhi >Parenting > मुलांचा मेंदू शार्प होण्यासाठी ४ मेमरी गेम्स; स्मरणशक्ती वाढेल-परीक्षेत पेपर जाईल सोपा

मुलांचा मेंदू शार्प होण्यासाठी ४ मेमरी गेम्स; स्मरणशक्ती वाढेल-परीक्षेत पेपर जाईल सोपा

How To Boost Child Memory Power : मुलांना  काही वस्तूंची चित्र वेगवेगळी काढून द्या. जसं की पुस्तक, पेन्सिल, बॅग नंतर मुलांना त्या वस्तू कोणत्या आहे त्याची नाव ओळखायला सांगा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:07 IST2024-12-08T21:59:46+5:302024-12-10T17:07:46+5:30

How To Boost Child Memory Power : मुलांना  काही वस्तूंची चित्र वेगवेगळी काढून द्या. जसं की पुस्तक, पेन्सिल, बॅग नंतर मुलांना त्या वस्तू कोणत्या आहे त्याची नाव ओळखायला सांगा.

How To Boost Child Memory Power Brain Training Games For kids | मुलांचा मेंदू शार्प होण्यासाठी ४ मेमरी गेम्स; स्मरणशक्ती वाढेल-परीक्षेत पेपर जाईल सोपा

मुलांचा मेंदू शार्प होण्यासाठी ४ मेमरी गेम्स; स्मरणशक्ती वाढेल-परीक्षेत पेपर जाईल सोपा

जर मुलांची मेमरी खूपच कमकुवत असेल तर याचा  अर्थ असा की त्यांचा मेंदू सामान्य स्वरूपात काम करत नाही. त्यांच्या मेंदूला जास्त ध्यान आणि अभ्यासाची आवश्यकता आहे. (How To Boost Child Memory Power Brain) मुलांची ब्रेन पॉवर आणि मेमरी वाढवण्यासाठी तुम्ही सोपा उपाय करू शकता. या खेळ खेळताना ब्रेन पॉवर वाढण्याबरोबरच विचार करण्याची क्षमता वाढते. 4 मेमरी गेम्स खेळून मुलांची ब्रेन पॉवर वाढवता येते. (How To Boost Child Memory Power Brain Training Games For kids)

1) मेमरी कार्ड गेम

काही कार्ड्सवर चित्र किंवा शब्द लिहून उलटं ठेवून द्या. नंतर मुलांना एक-एक कार्ड उचलण्यास सांगा नंतर त्यांना मॅच  करण्याचा प्रयत्न करा. ही एक उत्तम मेमरी एक्सरसाईज आहे.

जेवणात १ वाटी ही डाळ खा, बॅड कोलेस्टेरॉल घटेल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, वजन भराभर घटेल

2) सिक्वेंस रिवर्स  गेम

मुलांना  काही वस्तूंची चित्र वेगवेगळी काढून द्या. जसं की पुस्तक, पेन्सिल, बॅग नंतर मुलांना त्या वस्तू कोणत्या आहे त्याची नाव ओळखायला सांगा नंतर उलटा क्रम लावायला सांगा. हा खेळ खेळल्यानं मुलांचा फोकस आणि मेमरी शार्प राहण्यास मदत होईल. सिक्वेंस लक्षात ठेवणं आणि उलटं सांगितल्यानं ब्रेन एक्सरसाईज व्यवस्थित  होतात.

3) पजल टाईल्स

मुलांना पजल्सचे तुकडे एकत्र जोडायला सांगा. यामुळे त्यांची मेमरी चांगली होईल. त्यांना योग्य पजल शोधण्यास आणि जोडण्यास वेळ लागेल. हे गेम विचार करण्याची क्षमता वाढवतात. ज्यामुळे मेंदूला चालना मिळते. 

४) आय स्पाय विथ माय आय

या खेळात तुम्ही कोणतीही वस्तू शोधून त्याचे नाव सांगा. ही वस्तू शोधून नाव सांगितल्यानं मुलांची मेमरी चांगली चालेल आणि फोकसिंग एबिलीटी वाढेल.

Web Title: How To Boost Child Memory Power Brain Training Games For kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.