Join us  

लहान मुलांना ब्रश करायला कसं आणि केव्हा शिकवायचं? लहान मुलांचेही दात खूप किडतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 3:08 PM

How to brush your toddler's or infant's teeth : नेहमी असं दिसून येतं की लहान मुलं आई वडीलांची नक्कल करतात.जर मुलांबरोबर पालकांनीही ब्रश केले तर मुलांना लवकर सवय लागेल.

दात स्वच्छ आणि नीटनेटके असावेत असं लहानपणापासूनच सांगितलं जातं. यासाठी दोन वेळा ब्रश करणं,  पाण्यानं गुळण्या करणं आणि गोड कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. दातांच्या समस्येचं मुख्य कारण म्हणजे दातांची योग्य पद्धतीनं स्वच्छता न होणं. खासकरून जेव्हा लहान मुलं ब्रश करण्यात निष्काळजीपणा  करतात तेव्हा कॅव्हिटीज आणि गम्सच्या समस्या  उद्भवतात. (Dental care for toddler teeth & gums) लहान मुलांचे दात घासणं हे फारच कठीण काम.  ३ ते ६ वर्षाच्या मुलांच्या दातांची  त्यांच्या पालकांकडून व्यवस्थित दातांची काळजी घेतली जायला हवी. जेणेकरून पुढे गंभीर समस्यांचा सामना  करावा लागणार नाही. लहान मुलांना ब्रश करायला कसं शिकवायचं ते पाहूया. (The best way to brush children's teeth)

व्हेरीवेल फॅमिलीनुसार लहान मुलांना ब्रश करणं शिकवण्यासाठी तुम्ही स्ट्रेटेजी बनवू शकता. ज्या अंतर्गत मुलांना ब्रश करण्यााचे फायदे आणि नुकसान यांबाबत सांगितले जाईल. नेहमी असं दिसून येतं की लहान मुलं आई वडीलांची नक्कल करतात.जर मुलांबरोबर पालकांनीही ब्रश केले तर मुलांना लवकर सवय लागेल

ब्रश करताना मुलं दूर पळत असतील  तर त्यांना ब्रश करण्याच्या फायद्यांबाबत समजवा. त्यांच्या दातांच्या चांगल्या विकासासाठी हे गरजेचं आहे. एक ते दोन वेळा ब्रश करून किटाणूंना मारता येऊ शकते.  खेळता खेळता मुलांना ब्रश करायला शिकवू शकता. यासाठी मुलांच्या हातात टूथपेस्ट द्या.  त्यानंतर ब्रशकडचा भाग  ३ मोजेपर्यंत ओला करायला  सांगात. नंतर टुथपेस्ट ब्रशवर लावा. २ मिनिटांचा टायमर ऑन करा नंतर मुलांना ब्रश वर, खाली उजवीकडे-डावीकडे फिरवायला सांगा.

तोंडाला चार भागांमध्ये कसे विभाजित करायचे हे मुलांना शिकवा. टायमर संपल्यानंतर मुलांना गुळण्या करायला सांगा. स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस केल्यानं  मुलं लवकरच ब्रश करायला शिकतील.  जेव्हा तुमचं मूल ३ वर्षांपेक्षा मोठं असतं तेव्हा कमीत कमी २ मिनिटं ब्रश करायला हवं. दातांची छिद्र साफ करायला हवीत.  याशिवाय नियमित फ्लोसिंग करा. यामुळे तुमच्या बाळाचे दात स्वच्छ राहतील इतकंच नाही तर आरोग्यही चांगले राहील.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स