मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल आणि ते खेळण्यात त्यांचे मन लागत असेल तर तुम्ही त्यांच्या आवडत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. (Parenting Tips in Marathi) मुलांना मोटिव्हेट करत राहा आणि त्यांना प्रोत्साहन देत राहा. (Parenting Tips) आई वडिलांनी आपल्या मुलांचे पॅशन जपण्यात आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू देण्यात प्रोत्साहन द्यायला हवे. या पद्धतीने मुलं त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतील. (How to Build a Well Rounded Child)
द पिलर्स ख्रिचन लर्निंग सेंटर च्या रिपोर्टनुसार मुलांसाठी पालकांनी कायम सपोर्ट सिस्टिम बनायला हवं. त्यांच्यासाठी कोणतीही मर्यादा सेट न करता त्यांन काम करण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन द्या. मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती वाढेल याची काळजी घ्या. नवीन स्किल समजावून सांगा, मुलांचे कौतुक करा, मुलांच्या सतत मागे लागणं टाळा.
मुलांना कशात इंस्टरेस्ट आहे ते लक्षात घ्या
जेव्हा क्रिएटिव्ह होण्याचा विषय येतो तेव्हा आपण मुलांना ड्राँईंगसाठी पेंसिल आणि पेपर देऊन बसवतो. जर मुलांना त्यांच्या हिशोबाना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि सतत नवीन काहीतरी करण्याची इच्छा सुद्धा होईल.
स्वत:चे प्रोब्लेम स्वत: सॉल्व्ह करायला शिकवा
मुलांना स्वतचे प्रोब्लेम्स स्वत: सॉल्व्ह करायला शिकवा. जेणेकरून भविष्यात कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाणार नाहीत. नेहमी समस्या सोडवण्याची तयारी ठेवण्याची तयारी ठेवतील. गणिताचा कोणताही फॉर्म्यूला असो किंवा कोणतीही खेळणी तोडून परत जोडायची असो. मुलांना कोणत्याही बाबतीत रोखठोक करू नका. यामुळे मुलं चॅलेंजेस स्विकारतील आणि पूर्ण करतील
दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात
स्क्रीन टाईम कमी करा
स्क्रिन टाईम कमीत कमी असेल याकडे लक्ष देवा. मुलं स्क्रिन व्यतिरिक्त इतर कामांमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवतील तर त्यांची कॉग्नेटिव्ह ग्रोथ चांगली होईल. तुम्ही मुलांना बुक रिडींग, आर्टि, क्राफ्ट, म्युझियममध्ये जाणे, गेम्स यामध्ये सहभाग घेण्यासाठी मोटिव्हेट करू शकता.
रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम
मुलांना जास्तीत जास्त आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा
मुलांना जर आपले आई वडिल आपल्यावर खूप प्रेम करतात आपल्याला समजून घेतात याची कल्पना असेल तर ते नेहमी खूश राहतात. त्यांना नवीन गोष्टी करण्याची इच्छा होते. त्यांना कसलीच भिती नसते आणि प्रत्येक एक्टिव्हीटीत ते स्वत:हून सहभाग घेतात.
मुलांना हार्ड वर्कचे महत्व समजावून सांगा
मुलांना हार्ड वर्क आणि प्रॅक्टिसचं महत्व समजावून सांगा. जर तुम्ही त्यांना टॅलेंडेट होण्याबाबत सांगाल ते मेहनत करण्यावर जास्त भर देणार नाहीत. म्हणून मुलांना नेहमी महत्व समजावून सांगा. मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन द्या. ऑल राऊंडर होण्यासाठी मुलांचे रोल मॉडेल बना. यासाठी तुम्ही डिसिप्लीन लाईफ जगा आणि मुलांसाठी एक उत्तम उदाहरण बना.