Join us  

तुमचीही मुलं आहेत हुशार पण आत्मविश्वास कमी पडतो? करा ३ गोष्टी- मुलांचा कॉन्फिडन्स चटकन वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 4:52 PM

How to Built up Confidence in Child: मुलं कॉन्फिडन्ट व्हावी, असं वाटत असेल तर पालकांनी मुलांच्या बाबतीत या ३ गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं....

ठळक मुद्दे पालकांच्या बोलण्यातून येणाऱ्या काही गोष्टी मुलांचा आत्मविश्वास जसा वाढवू शकतात, तसाच घालवूही शकतात

काही मुलं खूप हुशार असतात. पण त्यांच्यात कॉन्फिडन्स कमी असतो. त्यामुळे मग चारचौघांत ते जरा बुजल्यासारखं करतात. पाहूणे आले तर त्यांच्यासमोर येणं टाळतात. किंवा अनोळखी लोकांसोबत बोलण्याची त्यांना भीती वाटते. मुलांच्या अशा वागण्याला बऱ्याचदा पालक जबाबदार असतात तर अनेकदा मुलांचा स्वभावच तसा असतो. या दोन्ही प्रकारांमध्ये मुलांचा कॉन्फिडन्स कमी असेल तर मुलांशी बोलताना या ३ गोष्टींकडे पालकांनी नेहमी लक्ष द्यायला पाहिजे (How to built up confidence in child?). कारण पालकांच्या बोलण्यातून येणाऱ्या काही गोष्टी मुलांचा आत्मविश्वास जसा वाढवू शकतात, तसाच घालवूही शकतात (Parents should avoid 3 mistakes that makes child to loose his confidence). याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या ishinna_b_sadana या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

मुलांचा कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी....

१. मुलांना सारखी रोखटोक नको

काही पालक मुलांना सतत हे करू नको, ते करू नको... असं म्हणत रोखत असतात. मुलांनी काय केलं पाहिजे काय नाही, याच्या सतत सूचना देत असतात. काही ठराविक वेळेपर्यंत हे ठीक आहे.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

पण पालकांनी या गोष्टीचा अतिरेक केला, तर नक्कीच मुलं त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतील. त्यामुळे मुलांना मुलांचं ठरवू द्या. काही वेळा त्यांनाही त्यांच्या आवडीच्या, त्यांच्या निर्णयानुसार त्यांनी ठरविलेल्या गोष्टी करू द्या. त्यातून ते त्यांचा आत्मविश्वास वाढत जाईल.

 

२. मुलांची स्तुती करा

बऱ्याचदा पालक मुलं काय करत नाहीत, याचा पाढा त्यांच्यासमोर आणि घरी आलेल्या पाहुण्यांसमोरही वाचून दाखवतात. तेच ते ऐकून मुलांना असं वाटू लागतं की आपण काहीच करत नाही, आपल्याला काहीच येत नाही.

दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

ही गोष्ट त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करते. त्यामुळे काही वेळा मुलांना त्यांचं काय चुकतं किंवा ते काय करत नाहीत ते जरूर सांगा. पण त्यापेक्षा जास्त वेळा मुलांमधल्या चांगल्या गोष्टींचही कौतूक करा. 

 

३. मुलांना रागवताना नियंत्रण ठेवा

काही पालक मुलांचं काही चुकलं तर मुलांवर खूप जास्त चिडचिड करतात. मुलांना गरजेपेक्षा जास्त रागवतात.

लेक आणि सून यात काय फरक असतो? करिना कपूरने विचारला सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर सांगतात..

त्यामुळे आपण रागाचा अतिरेक तर करत नाही ना, हे एकदा तपासून पाहा. छोट्याशा चुकीसाठी गरजेपेक्षा जास्त रागवत असाल तर यामुळे मुलांच्या मनावर खूप नकारात्मक परिणाम होत जातो. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं