Join us  

५ वर्षांपर्यंतची मुलं खूप हट्टीपणा करतात? रडून धिंगाणा करतात? पालकांनी करायला हव्या ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 4:27 PM

How to control an angry and stubborn 5-year-old child? : मुलांनी हट्टीपणा करू नये म्हणून पालकांनी ५ चुका टाळायल्या हव्यात..

पालक होणं सोपं नाही (Parenting Tips). मुलाच्या संगोपनापासून ते संस्कार सगळ्या गोष्टींकडे पालकांना बारकाईने लक्ष द्यावे लागते. बऱ्याचदा मुलं हट्टी होतात, किंवा कोणाचंही ऐकत नाहीत (Child Care). अशावेळी पालकांकडून नकळत घडणाऱ्या चुकांमुळे असे होऊ शकते (Stubborn Kid). विशेषतः २ ते ५ वर्षांची मुलं हट्टी असतात. या वयोगटातील मुलं आपला हट्टीपणा सोडत नाही.

अशावेळी काही पालक मुलांचे ऐकून हट्ट पुरवतात. पण ही बाब कितपत योग्य आहे? यामुळे मुलं अधिक हट्टी होतात. यानंतर त्यांना सांभाळणं खूप कठीण होऊन बसते. मुलांचे अति लाड करणे, हव्या त्या गोष्टी वेळेत पुरवणे, यामुळे मुले हट्टी होतात. मुलं जर हट्टी होऊ नये, असे वाटत असेल तर, पालकांनी वेळीच ५ गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. यामुळे मुलं हट्टी होणार नाही(How to control an angry and stubborn 5-year-old child?).

मुलांचा हट्टीपणा आणि रागावर नियंत्रण कसे ठेवावे?

मुलांचे मन डायव्हर्ट

काही मुलं रागीट असतात. जर ते हट्टीपणा करीत असतील तर, त्यांचे मन इतर गोष्टीकडे वळवा. दुसऱ्या कामात, अभ्यासात, खेळाकडे किंवा बोलण्याकडे लक्ष वळवा. २ ते ५ वयोगटातील मुलं जितक्या सहजतेने आग्रह धरतात तितक्या सहजपणे त्या गोष्टी विसरूनही जातात. जेव्हा आपले मुल हट्ट धरेल, तेव्हा लगेच त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करा.

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

समजावून सांगण्याचा प्रयत्न करा

मुलाच्या हट्टीपणावर एका दिवसात मात करता येणार नाही. यासाठी आपल्याला मुलांना वारंवार गोष्टी समजावून सांगाव्या लागतील. त्यांना हट्टीपणाचे दुष्परिणाम समजावून सांगा. पण जर मुलांचा हट्टीपणा चांगल्या गोष्टींकरीता असेल तर, ते अवश्य पूर्ण करा.

मुलांना वेळ द्या

जेव्हा आई - वडील दोन्ही जॉबवर असताना, दोघांनाही मुलाला वेळ द्यायला जमत नाही, अशावेळी मुलांना पालकांचा सहवास लाभत नाही. यामुळे मुलांमध्ये हट्टीपणा किंवा वागण्याशी संबंधित समस्या अधिक उद्भवतात. अनेक वेळा एकटी राहणारी मुलं जास्त हट्टी होतात. त्यामुळे जरी आपण काम करीत असाल, तरी घरी पोहोचल्यावर मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या.

मुलांशी चांगले वागा

पालकांनी मुलांशी चांगले वागणे आवश्यक आहे. घरातील वातावरणातून मुलं शिकतात. त्यामुळे मुलांसमोर मोठ्याने बोलू नका, ओरडू नका, भांडू नका. मुलं आपल्या पालकांना डोळ्यासमोर आदर्श ठेऊन मोठे होतात. यासाठी त्यांच्यासमोर नेहमी चांगले वागा.

सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..

प्रत्येक हट्ट पूर्ण करू नका

आजकाल एकटे मूल असल्याने पालक मुलाची प्रत्येक मागणी पूर्ण करतात. असे केल्याने मुल जास्त हट्टी होते. जेव्हा मुल एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरतो, तेव्हा सहजासहजी ती गोष्ट मुलांना देऊ नका. जर मुलांची मागणी योग्य असेल तर, ती अवश्य पूर्ण करा. मुलांना पैशाचे महत्त्व सांगा. 

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरल