काही मुलं खूपच आज्ञाधारी असतात, तर काही मुलं अजिबात मुलं हट्ट ऐकत नाहीत, आई वडील मुलांना हॅण्डल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. (Parenting Tips) तुम्ही मुलांशी जसं वागता तसंच मुलंही तुमच्याशी वागतात. (How To Control Angry) कोणतीही गोष्ट मुलं लगेच शिकतात आणि त्यांच्यात पॉवरही असते. मुलं जास्त जिद्द करत असतील. मुलांना हॅण्डल करण्याासठी काही सोप्या पॅरेटींग टिप्स फायदेशीर ठरतील. (What To Do When Your Child Doesnt Listen You Here Are The 5 Things You Can Try)
एनएचएस युके च्या रिपोर्टनुासर मुलांना राग येण्याची काही कारण आहेत जसं की पालकांशी न पटणं, फ्रेड्स सर्कल चांगला नसणं, सतत तणावात असणं (Ref) मुलांचा राग कमी करण्यासाठी त्यांना १ ते १० आकड्यांची गणती करायला सांगा, हळूहळू श्वास घेणे-सोडणं ही क्रिया करा, त्याच्याशी जास्तीत जास्त बोला. जॉगिंग, सायकलिंग अशा एक्टिव्हीज करायला सांगा.
1) जास्त रोख-टोक करू नका
मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यांच्यात जिज्ञासू वृत्ती असते. मुलांना रोक-ठोक करू नये. मुलांच्या चुका वेळीच सुधारणं गरजेचे असते. त्यांना कोणत्याही गोष्टी करण्यापासून रोखू नका. सगळ्यात आधी स्वत:च्या चुका सुधारा नंतर मुलांना समजून घ्या.
2) वाईट शब्द वापरू नका
मुलं तुमचं म्हणणं ऐकत नसतील तर चुकीच्या शब्दांचा वापर वापर करू नका. यामुळे तुमचं बिहेविअर टॉक्सिक असू शकते. शब्द मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. विचार करून शब्द वापरा. मुलं जास्त ओरडल्यामुळे किंवा मारल्यामुळे त्यांच्यातील भिती कमी होते. अशा स्थितीत मुलांना समजायला हवं की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्यानं मूलं समजदार होतात.
3) मुलांना प्रत्येक गोष्टीत लेक्चर देऊ नका
मुलं आपली मनमानी करत असतील तर त्यांना मोठं लेक्चर देऊ नका. मुलांना जर कोणती गोष्टी समजून नसेल तर त्यांना ओरडू किंवा रागवू नका. ज्यामुळे मुलं तुमच्या बोलण्याला सिरियस घेणार नाहीत. मुलांना त्याच्या भाषेत समजवून सांगा.
मुलांना आज्ञाधारी बनवायंच असेल तर त्यांना योग्य डायरेक्शन मिळण्यासाठी मोटिव्हेट करायला हवं. त्यांच्या अचिव्हमेंट्सचे कौतुक करा. असं केल्याने तुम्ही त्यांच्याशी जास्त कनेक्टेट राहाल. मुलांनी चांगलं वागावं यासाठी तुम्ही त्यांच्या वागण्यावर नियंत्रण न ठेवता त्यांना मोकळेपणा द्या. त्यांच्याबरोबर तुम्हीही लहान मुलं होऊन त्यांना शिकवा.