Join us  

‘करु नकोस’ असं म्हंटलं की मुलं मुद्दाम तीच गोष्ट करतात? बघा काय केलं तर मुलं शहाण्यासारखं ऐकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 2:53 PM

Parenting Tips: ज्या गोष्टीला आपण नाही म्हणतो, नेमकं तेच मुलांना करायचं असतं... असं तुमच्याही मुलांच्या बाबतीत होतं का? (How to convince child for not doing wrong things?)

ठळक मुद्देबघा एकदा प्रयोग करून आणि पाहा मुलांमध्ये काय बदल दिसतोय..

कधी कधी मुलांना कसं सांभाळावं तेच कळत नाही. कारण आपण त्यांना जे सांगतो, ते त्यांना ऐकायचंच नसतं. बऱ्याचदा तर असं होतं की आपण मुलांना एखादी गोष्ट करायला नाही म्हणालो की त्यांना नेमकी तीच गोष्ट करायची असते. आपण जेवढ्या जोरात त्यांना अमूक एक गोष्ट करू नको म्हणून बजावतो, तेवढ्याच तावातावात ते ती गोष्ट करण्यासाठी पुढे सरसावतात. अशावेळी मुलं आपलं ऐकत नाहीत, म्हणून आपण त्यांच्यावर चिडतो- ओरडतो. पण याचा काहीच उपयोग होत नाही (Parenting Tips). पुन्हा पुढच्यावेळी त्यांना जे करायचं असतं तेच ते करतात. (How to convince child for not doing wrong things?)

 

काही अपवाद सोडले तर असं चित्र बहुतांश सगळ्याच घरात दिसून येतं. म्हणूनच आता त्यावरचा छानसा उपाय पाहूया.. यामुळे मुलं तुमचं म्हणणं ऐकतील. त्यामुळे चिडचिडही होणार नाही आणि विनाकारण मुलांवर ओरडावंही लागणार नाही.

हॅण्डलूम टिश्यू साडीवर सोन्याची जर! बघा मनीष मल्होत्राने जान्हवी कपूरसाठी डिझाईन केलेली सुंदर साडी

आता अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय आणि कुठे चुकतं याविषयी एक छानशी माहिती देणारा व्हिडिओ vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यात असं सांगण्यात आलं आहे की आपण मुलांना अमूक एक गोष्ट करू नको, असं बजावतो. त्यावेळी आपला टोन नकारात्मक असतो. हा टोन बदलून आपण मुलांना काय करू नको, यापेक्षा काय करावं, असं सांगितलं पाहिजे.

 

उदाहरणार्थ मुलं जर सोफ्यावर उड्या मारत असतील तर आपण त्यांना 'तिथे उड्या मारू नकोस, उतर खाली..' असं सांगतो. त्याऐवजी मुलांना असं सांगावं की'तु उड्या मार पण इथे जमिनीवर मार किंवा ट्रॅम्पोलिनवर मार..'.

‘तो’ चक्क दुकानात पुतळा बनून उभा राहिला, दुकानच लुटून घेऊन गेला, पाहा चोराचं भन्नाट डोकं

याचा परिणाम असाच होतो की मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळते. आपण त्यांच्यावर बंधन घालतो आहोत, त्यांना उड्या मारायच्या आहेत आणि आपण त्यांना रोखतो आहोत, असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे मुलांना सकारात्मक उत्तर द्या आणि ती अमूक गोष्ट कुठे करावी, याचे पर्याय त्यांच्यासमोर खुले करा.. बघा एकदा प्रयोग करून आणि पाहा मुलांमध्ये काय बदल दिसतोय..

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं