Accept Your Child The Way They Are : आपल्या लहान मुलांसोबत मजबूत नातं तयार करणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी तर महत्वाचं असतंच, सोबतच त्यांच्या विकासातही महत्वाची भूमिका बजावतं. अनेकदा बघायला मिळतं की, काही पालक आपल्या मुलांसोबत तेवढे जुळलेले नसतात, जेवढी त्यांची ईच्छा असते. अशात मुलांसोबत स्ट्रॉंग बॉडिंग तयार करण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यांद्वारे तुमचं मुलांसोबत चांगलं बॉडिंग तयार होईल.
१) मुलांवर दबाव टाकू नका
आजकालचे पालक मुलांच्या भल्यासाठी खूप मेहनत करतात आणि त्यांना एक चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करतात. पण अनेक या प्रयत्नात मुलांवर दबाव टाकल्यासारखं होतं. जे त्यांच्या मेंटल आणि इमोशनल प्रोग्रेससाठी नुकसानकारक ठरू शकतं. जर तुमच्या मुलांना डान्स करणं, गाणं, किंवा ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना त्या गोष्टी एन्जॉय करू द्या. त्यांना क्लासेसमध्ये बांधून बंदिस्त करू नका. असं केलं तर काही दिवसातच त्यांचं मन त्या गोष्टीवरून उठू शकतं. मुलांना त्यांच्या मनासारखं करण्यासाठी प्रेरित करा, त्यांच्यावर दबाव टाकू नका.
२) इतरांशी तुलना करू नका
आपल्या मुलांची तुलना इतर मुलांसोबत करणं सामान्य आहे. पण याचा मुलांच्या सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ कॉन्फिडन्सवर वाईट प्रभाव पडतो. अशात मुलं मोटिवेट न होता, ते स्वत:ला कमी लेखतात आणि इतर मुलांचा रागही करू लागतात. त्यामुळे त्यांची इतरांशी तुलना करू नका.
३) जसे आहेत तसे स्वीकारा
आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीच्या परफेक्शनसाठी फोर्स करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा. एक्सपर्टनुसार अनेकदा आई-वडील हे समजत नाही की, मुलांना आहेत तसं स्वीकारणं म्हणजे काय? तर मुलांचं सतत कौतुक करणं अजिबात योग्य नाही.
अशानं मुलं तेच काम करतील ज्यात त्यांचं कौतुक होतं. ते तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि ज्या गोष्टीसाठी त्यांचं कौतुक होणार नाही तेव्हा ते निराश होतील. त्यामुळे मुलं स्वत:ची कामं स्वत: करत असतील तर त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांना हे सांगा की, हे त्यांचंच काम आहे. त्यांना प्रश्न विचारा. जेव्हा मुलांना हे समजतं की, त्याचे आई-वडील त्याला आहे तसं स्वीकारत आहेत, तेव्हा त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो.
४) प्रेरणा आणि समर्थन
प्रेरणा आणि समर्थन म्हणजे मुलांवर एखाद्या गोष्टीचा दबाव टाकणं नाही. त्यांना अशाप्रकारे प्रोत्साहन द्या की, त्यांना त्यांचे गोल्स अचीव्ह करण्यास मदत मिळेल. पण हे करत असताना त्यांच्यावर कोणतंही प्रेशर टाकू नका. त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. जेणेकरून ते स्वावलंबी बनू शकतील.