Join us

मुलांना न ओरडता, न धमकवता शिस्त लावण्याची खास ट्रिक; मुलांना लागेल चांगलं वळण चटकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:57 IST

How To Discipline Children : मुलं जर चारचौघात त्रास देत असतील किंवा पालकांना उलट बोलत असतील तर मारून किंवा ओरडून मुलं समजावतात.

 मुलांचे पालनपोषण सोपं नसते. आई-वडील आपल्या मुलांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेतात.  मुलं काय खातात, त्याचं वागणं कसं आहे, मुलं कसं बोलतात (Parenting Tips) यावर त्याचं वागणं अवलंबून असते. मुलं जर चारचौघात त्रास देत असतील किंवा पालकांना उलट बोलत असतील तर मारून किंवा ओरडून मुलं समजावतात. ओरडण्याचा आणि मारण्याचा मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होतो. मुलांना न मारता, न ओरडता शिस्त कशी लावता येईल ते पाहूया. (How To Discipline Children Without Scolding Or Beating Them Parenting Tips To Discipline Child)

1) मुलांच्या चांगल्या  वागण्याचे कौतुक करा

जेव्हा मुलं लहान असतील तेव्हा त्यांचा चांगला, वाईट यातील फरक शिकवणं गरजेचं आहे. यासाठी मुलांना त्यांना वागण्याबाबत शाबासकी द्या. मुलांच्या चांगल्या वागण्याचे कौतुक केले तर ते चांगलं वागण्यास प्रोत्साहित होतील.

भाकरी थापताना तुटते-कधी कडक होते? टम्म फुगलेली, मऊ ज्वारीची भाकरी करण्याची सोपी रेसिपी

2) निर्णय घेण्याची संधी द्या

अनेकदा मुलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचं स्वातंत्र्य द्या. मुलं जर चुकीचं वागत असतील किंवा कोणत्याही गोष्टीबाबत जिद्द करत असतील तर ते त्यांच्यासाठी चुकीचे ठरू शकते. मुलांनी काय करावे हा निर्णय त्यांचा असेल तर चूक झाल्यानंतर त्यांची चूक त्यांना कळून येईल.

3) आधी स्वत:मध्ये बदल करा

मुलांना फक्त सांगून चालणार नाही की चांगली कामं करा, हे करू नका, ते करू नका. मुलांचे वागणं चांगले बनवण्यासाठी तुम्ही स्वत: चांगलं वागायला हवं, असं नको व्हायला की तुम्ही स्वत:ओरडून बोलत आहात आणि मुलांकडून शांत राहण्याची अपेक्षा करता. पालक मुलांचे गुरू असतात म्हणून पालक जसं वागतात तसंच मुलंही अनुकरण करतात.

4) मुलांच्या समस्या समजून घ्या

आई-वडील अनेकदा मुलांचे चुकीचं वागणं आणि चुका बघतात पण मुलं असं का वागतात त्याचं कारण समजून घेत नाहीत. पालकांनी बसून मुलांना हे प्रश्न विचारायला हवेत. जेणेकरून मुलांच्या चिडचिड करण्याचं, राग-राग करण्याचं कारण समजून घेता येईल.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं