Lokmat Sakhi >Parenting > ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही

ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही

How To Discipline Without Hitting : मुलांना शिस्त लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 11:19 AM2023-02-17T11:19:48+5:302023-02-17T13:38:58+5:30

How To Discipline Without Hitting : मुलांना शिस्त लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी

How To Discipline Without Hitting : Harassed or Hit children's? If you want to discipline without hitting, remember 5 things | ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही

ऐकलं नाही तर मुलांना रट्टे देता? मुलांना शिस्त लावायची तर लक्षात ठेवा ५ गोष्टी, मारायची गरजच नाही

Highlightsमारणं हा चांगला उपाय नसून त्याऐवजी काय केल्याने मुलं ऐकतील याविषयी..मुलांची मानसिकता समजून घ्या आणि मगच शिस्त लावा

लहान मुल घरात असलं की घर भरल्यासारखं वाटतं, मुलांचा सतत दंगा सुरू असतो. दंगा करणं एकवेळ ठिक आहे, पण त्याबरोबरच मुलांना वेळीच चांगल्या सवयी लागायला हव्या. लहान वयात चांगल्या सवयी आणि शिस्त लागली तर पुढे आयुष्यभर ते कामी येतं. नाहीतर मग पालक म्हणून आपल्यालाच त्यांना सांभाळणे अवघड जाते. काही वेळा मुलं आपण सांगितलेलं सहज ऐकतात. पण काही वेळा मात्र मुलं अजिबात ऐकत नाहीत. अशावेळी आपण त्यांना ओरडतो, कधी मोठ्या आवाजात रागावतो आणि अगदीच नाही ऐकलं तर हातही उगारतो (How To Discipline Without Hitting). 

शिस्त लावणं हे इतके सोपे काम नसते. मुलांना नीट समजावून, सहनशक्ती ठेवून काही गोष्टी केल्या तरच त्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीने झिरपतात. शिस्त लावण्यासाठी त्यांना लगेचच ओरडणे, मारणे हे योग्य नाही. पण ८० टक्के पालक तेच पर्याय निवडताना दिसतात. अशाप्रकारे मुलांना मारण्यामुळे ते तात्पुरती एखादी गोष्ट ऐकतात पण दिर्घकाळ मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. प्रसिद्ध समुपदेशक आचल जिंदाल मुलांना शिस्त लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी अतिशय महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. 

(Image : Google)
(Image : Google)

१. तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा

तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण असेल किंवा दुसरा कोणता राग मुलांवर निघत असेल तर तो ओळखा आणि त्यावर उपाय करा. कारण बरेचदा आपला दुसरीकडचा ताण किंवा राग मुलांवर निघतो, असे करणे अतिशय चुकीचे आहे.

२. प्रेमाने सांगा

मुलांना एखादी गोष्ट ओरडून किंवा मारुन सांगण्यापेक्षा प्रेमाने सांगितली तर ते पटकन ऐकतात. परिस्थिती ताणाची झाली असेल तर आधी आपण शांत व्हावे, मुलांनाही शांत होऊ द्यावे आणि नंतर त्यांना प्रेमाने ती गोष्ट समजून सांगावी. यामुळे मुलं आपलं म्हणणं ऐकण्याची शक्यता जास्त असते. 

३. मुलांना चुकीचे परीणाम सांगा

मुलं एखादी गोष्ट करायला तयार नसतील तर त्यांना त्यासाठी त्यांना काय परीणाम भोगायला लागतील याबद्दल वेळीच सांगा. उदाहरणार्थ, मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांना फिरायला नेणार नाही किंवा स्क्रीन टाइम रद्द होईल असे सांगा.

४. मुलांकडे लक्ष द्या

मुलांना आईवडीलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेले हवे असते. मात्र आपण घरातली कामं, ऑफीस, मोबाईल यांच्या नादात मुलांना पुरेसा वेळ देत नाही. त्यामुळे मुलं अस्थिर होण्याची शक्यता असते. 

५. कौतुक करा 

आपण मुलं चुकीची वागली की त्यांना ओरडतो. पण हेच त्यांना एखादी चांगली गोष्ट केली की मात्र आपण त्यांचे कौतुक करत नाही. असे न करता मुलं जेव्हा चांगलं वागतात तेव्हा त्यांचे कौतुक करायला विसरु नका. 

Web Title: How To Discipline Without Hitting : Harassed or Hit children's? If you want to discipline without hitting, remember 5 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.