लहान मुलांमध्ये चांगल्या सवयी लागू करणे हे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. मुलांनी नेहमी चांगले बोलावे, शहाण्यासारखं वागावं, मोठ्यांचा आदर करावा, ही शिकवण पालक मुलांना देत असतात. पण काही मुलं याच्या उलट करतात. चारचौघात हट्ट धरतात, आरडाओरडा करतात यासह बरच काही.
मात्र, लहान मुलांना समजून घेणं कठीण आहे. त्यांच्या गरजा जाणून घेणं अवघड आहे. लहान मुलं आपल्या आई - बाबांना आदर्श मानतात. त्यामुळे पालकांनी देखील मुलांच्या उत्तम विकासासाठी काही गोष्टी करणे गरजेचं आहे(How to discipline your child the smart and healthy way).
मुलं सकाळी लवकर उठतच नाही? करा ४ सोप्या गोष्टी, मुलं उठतील हाक न मारता..
व्हेरिवेल फॅमिली या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पालक बनणे सोपे नाही, त्यांचे ध्येय लक्षात ठेऊन, त्यांच्या स्वप्नांना आकार देणं गरजेचं आहे. मुलांसमोर येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या पुरेसे मजबूत बनवणे, यासह लहानपणापासूनच इतर जबाबदाऱ्या त्यांच्यासोबत शेअर करणे, यासाठी त्यांना तयार करणे गरजेचं आहे.
पालकांनी मुलांसाठी या ४ गोष्टी करायलाच हव्या
- घरात किंवा घराबाहेर, मुलांवर आई - वडिलांचा धाक असायला हवा. या नियमामुळे मुलांमध्ये शिस्त राहते. यामध्ये योग्य वेळी घरी येणे आणि घराची देखभाल करणे इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्यासमोर आपण जीवन जगण्यासाठी किती मेहनत घेतो, ती मेहनत - अनुभव त्यांच्यासोबत शेअर करा.
- मुलांना नेहमी नियमात अडकवून ठेऊ नका. नियमात फ्लेक्झिबलिटी असणं गरजेचं आहे. हॅम्पशायर युनिव्हर्सिटीच्या मते, आवश्यकतेपेक्षा जास्त नियम लादल्याने संगोपनात अडचणी निर्माण होतात. मुलं नियम तोडण्यासाठी खोटं ही बोलू शकतात. त्यामुळे त्यांना थोडी स्पेस द्या.
- काही पालक आपल्या मुलांसोबत दिनचर्या किंवा इतर गोष्टी शेअर करतात. यामुळे मुलं देखील आपल्या पालकांसोबत गोष्टी शेअर करू लागतात. अशा स्थितीत दोघांमध्ये मैत्रीचे बॉण्ड तयार होते. जेव्हा आपण त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करतो, तेव्हा मुलं भाषा, कौशल्य, अनुभव, इत्यादी गोष्टी शिकतात. जेव्हा मुलं गोष्टी शेअर करू लागतात, तेव्हा समजून जा तुमचे संगोपन योग्यरीत्या होत आहे.
मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत
- जर मुलांना आपण दररोज २० मिनिटे कोणतेतरी पुस्तक किंवा वृत्तपत्र वाचून दाखवत असाल तर, त्यांच्या विकासात खूप मदत होईल. यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढेल. यासह त्यांना देखील वाचनाची गोडी लागेल. त्यांना नवनवीन गोष्टींची माहिती मिळेल.