मुलांनी आपण म्हटलेलं सगळं ऐकावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. आपण मुलांच्या भल्यासाठी सांगत असतो आणि मुलांनी ते ऐकायला हवं अशी आपली किमान अपेक्षा असते. पण बरेचदा मुलांना आपण सांगितलेल्या गोष्टी न ऐकता त्यांच्या मनाचेच काहीतरी करायचे असते. काही वेळा तर आपण सांगतो म्हणून त्यांना ते न करता मुद्दाम दुसरेच काहीतरी करायचे असते. अशावेळी सुरुवातीला आपण पेशन्स ठेवून त्यांना समजावतो (How To get Kids Listen to You Parenting Tips).
पण ते अजिबातच ऐकत नसतील तर मात्र आपले पेशन्स संपतात. मग त्यांनी ऐकावं म्हणून कधी आपण त्यांना ओरडतो तर कधी धाक दाखवतो. अगदीच वेळ आली तर हातही उगारतो. मग मुलांची रडारड, आरडाओरडी या सगळ्यामुळे घरातली वातावरण खराब होते. त्यापेक्षा काही सोप्या टिप्स वापरल्या तर मुलं आपलं नक्की ऐकतात. पाहूया मुलांनी आपलं मनापासून ऐकावं यासाठी ५ सोप्या टिप्स...
१. त्यांच्यात इंटरेस्ट दाखवा
आपण मुलांना काहीतरी सांगतो. ते त्यांच्या गोष्टीत व्यग्र असतात आणि अचानक आपण काही सांगितले की त्यांना ते ऐकायचे नसते. त्यापेक्षा ते करत असलेल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवून ते काय करत आहेत ते समजून घ्या. त्याबाबत तुम्हाला उत्सुकता आहे हे जाणवले की ते खूश होतील आणि तुमचे म्हणणे ऐकण्याची शक्यता वाढेल.
२. हळूहळू तुमचे म्हणणे सांगा
एकदा तुम्हाला त्यांच्यात इंटरेस्ट आहे हे मुलांना लक्षात आले की त्यापुढे काय करायचे आहे हे मुलांना सांगा. त्यानंतर त्यांना पॅक अप करण्यासाठी वेळ द्या. म्हणजे ते तुम्ही म्हणताय ते करण्यासाठी तयार होतील.
३. सतत सूचना देऊ नका
तुम्ही मुलांना सूचना देताना सतत हे करु नको ते कर असे सांगितले तर मुलं वैतागतील. त्यापेक्षा त्यांना गाईड करा पण सूचना देऊ नका, म्हणजे ते तुमचं पटकन ऐकतील.
४. थोडक्यात सांगा
तुम्हाला मुलांना जे सांगायचंय ते थोडक्यात सांगा. त्यांना ते खूप मोठं वाटलं तर ते वैतागतात आणि आपलं म्हणणं ऐकण्याची शक्यता कमी असते. त्यापेक्षा तुम्हाला जे सांगायचंय ते नेमकं आणि थोडक्यात असू द्या.
५. कौतुक करा
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलांनी ऐकलं तर त्यांचं जरुर कौतुक करा. त्यांना थँक यू म्हणा. म्हणजे त्यांनाही आनंद होईल आणि पुढच्या वेळेस ते तुमचं नक्की ऐकतील.