Join us  

मुलं मोबाइल पाहतच जेवतात? जेवताना मोबाइल पाहण्याची सवय कशी तोडाल, आणि नाहीच तुटली तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 4:51 PM

How to get your child to get off the screen during meal time : मुलं जेवताना देखील मोबाईल फोन सोडत नसतील तर, शारीरिकच नव्हे तर, मानसिक आरोग्यावरही होईल परिणाम

लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल फोनचं व्यसन लागलं आहे. काही मुलांना जर मोबाईल फोन दिला नाही तर, ते जेवत देखील नाही. व्हिडिओ किंवा मोबाईल गेम खेळत त्यांना भरवावे लागते. मुलं इतकी हट्टीपणा करतात की शेवटी पालकांना आपल्या पाल्यांचे ऐकावे लागते.

अनेक पालक मुलांना जेवण भरवताना त्यांच्या हातात मोबाईल फोन देतात. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे त्यांच्या मानसिक यासह शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकते. यासंदर्भातली माहिती, नवी मुंबई स्थित मेडिकेअर हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. नरजोहन मेश्राम यांनी दिली आहे(How to get your child to get off the screen during meal time).

व्यसन

तज्ज्ञांच्या मते, 'जेवताना नियमित जर मुलं मोबाईल फोन वापरत असतील तर, त्यांना या गोष्टीचं व्यसन लागू शकतं. यामुळे मुलांवर वाईट परिणाम होते. किंबहुना रोज मोबाईल फोन पाहत जेवण केल्यामुळे त्यांना याची सवय लागू शकते. त्यामुळे मुलांनी कितीही हट्ट केला तरी, त्यांच्या हातात जेवताना मोबाईल फोन देऊ नका.'

वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब

किती खातोय हे कळत नाही

मुलं जेव्हा जेवताना मोबाईल फोनचा वापर करतात, तेव्हा त्यांना आपण किती प्रमाणात खात आहोत हे कळत नाही. त्यांचे जेवणाकडे लक्ष नसते. यामुळे ते अनकेदा जास्त प्रमाणात खातात, किंवा कमी प्रमाणात जेवतात. कधी-कधी मुलांना ते काय खात आहेत, हे देखील कळून येत नाही.

चव जाणवत नाही

तोंडात पदार्थ घातल्यास सर्वात आधी जाणवते ती चव. पदार्थाची चव उत्तम असेल तर आपण दोन घास एक्स्ट्रा खातो. पण मुलं जर मोबाईल फोन पाहत जेवत असतील तर, त्यांना आपण काय खात आहोत हे कळून येणार नाही. शिवाय पदार्थाची चव वाईट आहे की चांगली हे देखील कळणार नाही. अशा वेळी मुलं न आवडणारे पदार्थही आवडीने खातात. पण ते किती प्रमाणात खात आहेत, याचा अंदाज त्यांना नसतो.

फक्त ५ मिनिटं रोज घरात एकच व्यायाम करा, पोट-कंबर-पाय सगळीकडची चरबी होईल झटपट कमी

फॅमिलीसोबत टाईम स्पेंड न करणं

आजकाल बरेच मुलं आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत नाही. आपआपल्या खोलीत मोबाईल फोन घेऊन जेवण करणं पसंद करतात. एकत्र जेवण केल्याने फॅमिली बॉण्ड स्ट्रँाग होते. जेवण करताना फॅमिली एकमेकांशी सुख दुखः शेअर करते. पण एकत्र जेवण न केल्यामुळे मुलांना आपल्या फॅमिलीमध्ये काय चाललंय हे कळून येत नाही.

जेवण भरवताना पालकांनी मुलांसाठी काय करावे?

मुलांसोबत जेवण करताना किंवा त्यांना भरवताना खूप साऱ्या गप्पा गोष्टी करा.

जेव्हा मुलाला भूक लागते तेव्हाच त्याला खायला द्या.

जेवताना कोणी मोबाईल बघण्याचा हट्ट करत असेल तर, त्यांना समजावून सांगा.

मुलांच्या आवडीचे पदार्थ तयार करा. त्यांची डिश विविध पदार्थांनी सजवून तयार करा.

जेवताना पालकांनी सुद्धा मोबाईल बघणं टाळावे. कारण मुलं पालकांकडे बघून शिकतात.

टॅग्स :पालकत्वमोबाइलआरोग्य