Join us  

वयाच्या १६ व्या वर्षानंतरही वाढेल उंची; ५ उपाय, उंचीसोबत तब्येतही राहील निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 5:24 PM

How to grow height after 16 : १५ वर्ष वयोगटात मुलांची उंची वाढण्याचा वेगही कमी होतो.  चांगला आहार आणि आयुर्वेदीक उपायांनी १६ वर्ष वयोगटात मुलांची उंची वाढवण्यास मदत होऊ शकते.

मुलांच्या उंचीबाबत पालक नेहमीच चिंचेत असतात. काही मुलं वयाच्या तुलनेत जास्त मोठी किंवा वयाच्या हिशोबानं बरोबर दिसतात तर काहीजण  वाढत्या वयातही आपली उंची आणि तब्येतीमुळे लहान दिसून येतात.  उंची कमी असल्यानं मुलांच्या आत्मविश्वासावरही परीणाम होतो. (How To Increase Height After 16) उंची वाढवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. वेळीच काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास उंची वाढण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्यामते १८ वर्ष वयोगटात मुलाची उंची ४ टक्के दरानं वाढते. त्यानंतर हळूहळू मुलांची उंची वाढत जाते. १५ वर्ष वयोगटात मुलांची उंची वाढण्याचा वेगही कमी होतो. एका हिंदी साईटच्या रिपोर्टनुसार  चांगला आहार आणि आयुर्वेदीक उपायांनी १६ वर्ष वयोगटात मुलांची उंची वाढवण्यास मदत होऊ शकते. (How to grow height after 16)

पोषण

शरीराच्या चांगल्या वाढीसाठी हेल्दी डाएटची आवश्यकता असते. पौष्टीक नाश्ता किंवा जेवण शारीरिक विकासास मदत करते. एका बॅलेंन्स डाएट प्लॅनमध्ये व्हिटामीन आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. दूध, फळं, ताज्या भाज्या आणि कार्ब्स या पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते आणि शरीराची  वाढही चांगली होते. 

योगा

उंची वाढवण्याासाठी नियमित योगा करायला हवा. योगाभ्यास शरीरातील रक्त संतुलन सुधारते. यामुळे मांसपेशी मजबूत राहतात आणि हाडं बळकट होतात.  उंची वाढवण्यासाठी मुलांनी नियमित ताडासन, वीरभद्रासन ही योगासनं करायला हवीत.

ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, हे खरं की खोटं..

चांगली झोप

शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगली आणि अखंड झोप आवश्यक आहे. झोप न मिळाल्याने शारीरिक विकासही थांबतो. झोपताना शरीर मानवी वाढ संप्रेरक सोडते, परंतु जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा हार्मोन सोडला जात नाही. त्यामुळे मुलांची वाढ खुंटते. योग्य विकासासाठी, 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

मुद्रा

चांगल्या उंचीसाठी, शरीराची स्थिती योग्य असावी. चालणे, बसणे आणि झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे उंचीची वाढ थांबते. बसण्याच्या आणि उभ्या राहण्याच्या पद्धतीचा उंचीवर परिणाम होतो. माणसाने नेहमी सरळ बसावे आणि सरळ स्थितीत उभे राहावे. झोपतानाही तुमची मुद्रा योग्य असावी. डोके व मान झुकवून चालू किंवा बसू नये. योग्य आसनामुळे उंची ६ इंचांपर्यंत वाढण्यास मदत होते.

व्यायाम

व्यायाम ही नैसर्गिक पद्धत उंची वाढवण्यासाठीही प्रभावी आहे. 14-15 वर्षे वयापासून मुलांना नियमित व्यायाम करायला लावा. या प्रकारच्या व्यायामामुळे पाठीच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि पाठीच्या कण्यातील कम्प्रेशन कमी होते. उंची वाढवण्यासाठी मुलांनी सायकल चालवणे, दोरीवर उडी मारणे आणि कार्डिओ व्यायाम करावेत.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य