लहान मुलांचे मन खूपच नाजूक असते. प्रत्येकवेळी आई वडीलांना त्यांची काळजी घ्यावी लागते. झोपताना, दूध पिताना, खेळताना इतकंच नाही तर रडतानाही मुलांना त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. (Parenting Tips) मुलं रडत असतील तर आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर बरीच मुलं अजिबात रडणं थांबवत नाहीत तासनतास रडत बसतात त्यामुळे त्यांना अनेकदा ताप येतो. मुलं जसजशी मोठी होऊ लागतात त्यांचे नखरे वाढतात. अशावेळी मुलांवर कंट्रोल ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (How To Handle Temper Tantrum Behavior Of Child)
मुलांच्या मनासारखं काही झालं तर नाही तर राग व्यक्त करून आपल्या भावना दर्शवतात. त्याला टँपर असं म्हणतात. शारीरिक आणि मैखिक दोन्ही प्रकारचे टँट्रम असू शकतात. या फेजमध्ये मुलं चुकीचे वागणूक दाखवतात. ४ वर्ष किंवा त्यापेक्षा छोटी मुलं नियमित आठवड्यातून ९ वेळा नाटकं करतात. तर १५ मिनिटांपेक्षा जास्तवेळा हिंसक वर्तन करतात हा चिंतेचा विषय आहे. (How To Handle Tantrums And Meltdown)
एक्सपर्ट्स सांगतात की मुलांच्या वागण्यातील बदलाला टँपर टँट्रम म्हणतात. ज्यामुळे मुलं चिडचिड करतात आणि खूप रागावतात. अनेकदा मुलं उपाशी असू शकता किंवा त्यांना भूक लागते, झोपची कमतरता जाणवतात, पॅरेंट्सनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.
वजन वाढलंय-खाण्यावर कंट्रोल नाही? 2-2-2 मेटाबॉलिझ्म मेथडचा खास फॉम्यूला; स्लिम दिसाल
जास्त रिएक्ट करण्यापेक्षा थोड्यावेळासाठी एकटं सोडायला हवं. जेव्हा मुलांची आवडती गोष्टी जर त्यांना दिली नाही किंवा त्याच्याशी मनासारखं बोल्लो नाही तर मुलं रागवू लागतात किंवा रडायला लागतात. अशावेळी मुलंकडे फार लक्ष देऊ नये.
बाहेर नेल्यानंतर अनेक वेळा मुले अनावश्यक गोष्टींची मागणी करतात. अशा स्थितीत पालक त्यांना नाही म्हणतात. पण हे करू नका. कारण तुमच्या नाही म्हणण्याने मूल आणखी चिडू शकते. नाही म्हणण्यापेक्षा त्याला त्या गोष्टीमुळे होणारे नुकसान सांगा किंवा नंतर घेऊन देणार असे सांगा. आई वडील मुलांच्या रडण्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक मुलं आक्रमक बनतात ज्याचा पालकांनाच जास्त त्रास होऊ शकतो म्हणून मुलांना फार ओरडू किंवा रागवू नका.