Join us  

चारचौघात मुलं खूप त्रास देतात? हट्ट करतात, रडरड करतात, उलटून बोलतात? ३ टिप्स -पाहा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 9:45 AM

How to handle your kids tantrum in public : जेव्हा तुम्ही मुलावर ओरडता. तेव्हा ते मूल पूर्वीपेक्षा मोठ्याने ओरडू लागते.

लहान मुलं कधी एकदम शांत बसतात तर कधी ओरडून मार खाऊनही ऐकायला मागत नाही.  खासकरून जेव्हा तुम्ही मुलांना मॉल किंवा एखाद्या दुकानात नेता त्यावेळी एखाद्या वस्तूसाठी किंवा पदार्थासाठी हट्ट करतात अजिबात ऐकत नाहीत. (Parenting Tips) मुलांनी शांत राहून सार्वजनिक स्थळी शिस्तीत वागावं यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How To Deal With A Toddler's Public Temper Tantrum)

1) जर तुमचे मूल सार्वजनिक ठिकाणी असताना खूप रागावले किंवा आक्रमक झाले. तर तुम्ही त्याच्या वागणुकीवर ताबडतोब नियंत्रण ठेवावे. त्याला स्पष्ट शब्दात सांगा की त्याने असे कृत्य करू नये. त्याला समजावून सांगा की त्याच्यामुळे एखाद्याला दुखापत होऊ शकते आणि अशा प्रकारचे वर्तन अजिबात स्वीकार्य नाही. या सर्व गोष्टी बोलत असताना आपल्या बोलण्यावर संयम ठेवा पण या आत्मविश्वासाने बोला म्हणजे मूल त्याच्या वागण्यावर नियंत्रण ठेवायला भाग पडेल. (Parenting Tips)

2) जेव्हा तुम्ही तुमच्या मुलावर राग दाखता किंवा ओरडता. तेव्हा ते मूल त्याचा अपमान समजते आणि पूर्वीपेक्षा मोठ्याने ओरडू लागते. त्यामुळे लोकांसमोर तुमच्या मुलावर ओरडू नका. काही कारणास्तव तुम्ही मुलावर ओरडत असाल तर तुमच्या कृतीबद्दल ताबडतोब मुलाची माफी मागा जेणेकरून मुलाला हे समजेल की ओरडण्याने कोणतीही समस्या सुटत नाही आणि ही एक वाईट सवय आहे. असे केल्याने तुम्ही त्याच्या वागण्यात सकारात्मक गोष्टींचा समावेश करू शकता.

3) मूल सार्वजनिक ठिकाणी हट्ट का करत आहे, याचे मूळ कारण जाणून घेणे फार गरजेचे आहे.  द डिसिप्लीन मिरॅकलच्या लेखिका लिंडा पियर्सन म्हणतात, 'कधीकधी मुलांना बाहेर सोडावे लागते.  यामुळे त्याचे मन हलके होते. या काळात पालकांनी मुलांच्या जवळ राहून त्यांचा राग खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा मुल आपला राग व्यक्त करतो  तेव्हा पालकांनी शांत राहावे आणि संयम राखावा. याशिवाय राग दूर करण्यासाठी पालकांनी मुलाला मदत करावी. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स