मुलं अभ्यास करतात पण लक्षात काहीच राहत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (Smart Parenting Tips) आधीच्या काळी लोक ब्रम्ह मुहूर्तावर उठून अभ्यास करायचे. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की लवकर उठून अभ्यास केल्याने मेंदू चांगल्या पद्धतीने काम करतो एकाग्रताही वाढते. याशिवाय कोणताही विषय लक्षात ठेवण्याची क्षमताही वाढते.सकाळी उठण्याचे अनेक फायदे आहेत. (Parenting Tips)
एज्यूइनपूट.कॉमच्या माहितीनुसार बरेच विद्यार्थी सकाळी अभ्यास करतात काही जणांचा संध्याकाळी अभ्यास चांगला होतो. हे वैयक्तीकरित्या व्यक्तीवर अवलंबून असते. सकाळच्यावेळी वातावरणात शांतता असते. (Tips to Help Your Child Remember What he Has Studied) यामुळे मन आणि मेंदू दोन्ही शांत राहते. शांततेत तुम्ही कोणत्याही विषयावर विचार करून ध्यान करू शकता. यावेळेत अभ्यास केल्याने मेंदू रिलॅक्स राहतो. कॉर्न्सन्ट्रेशन चांगले राहते. मनात इतर विचार येत नाहीत अशावेळी तुम्ही जास्त व्यवस्थित अभ्यास करू शकता. (Five Smart Strategies to Help Kids Remember What They Read)
अभ्यासासाठी उठण्याची योग्य वेळ कोणती? (What is Best Time for Study According to Science)
जर अभ्यास करण्यासाठी लवकर उठायचे असेल तर सकाळी ४ ते ६ वाजताच्या दरम्यान उठणं फायदेशीर ठरेल. अभ्यास करण्याासाठी हा सगळ्यात बेस्ट टाईम मानला जातो. सकाळी लवकर उठून अभ्यास केल्यास मेमरी लॉस सारख्या समस्या उद्भवत नाहीत वाचलेलं जास्तवेळ लक्षात राहतं. तज्ज्ञांच्यामते अभ्यासाठीसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वेळ आणि दुपारी 4 ते 10 ही वेळ अभ्यासाठी चांगली असते. पण जर तुम्ही इतर कामं करत अभ्यासाचा समतोल साधत असाल तर रात्रीही अभ्यास करू शकता.
सुर्याची पहिली किरणं आल्यानंतर
सुर्याची किरणं मेंदूला एक्टिव्ह राहण्यास मदत करतात. तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. तुम्ही रात्री किती वाजता झोपताय यावर तुम्ही अवलंबून असते की सकाळी किती वाजता उठणार आहात. सुर्याच्या किरणांच्या बरोबरच तुम्ही दिवसाची सुरूवात करायला हवी. सुर्य मावळताना दिवस संपवावा. याला सेंस ऑफ वेलबिंग असं म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे.
मुलांना अभ्यास इन्जॉय करायला शिकवा
मुलांवर कोणत्याही गोष्टीचं ओझं बनतं तेव्हा ते लक्षात ठेवणं त्यांच्यासाठी कठीण होतं. अभ्यासाला एखाद्याला टास्कप्रमाणे पूर्ण करण्यापेक्षा मुलांना रिडींग इन्जॉय करायला शिकवा.
नोट्स तयार करा
मुलांनी जे काही वाचले आहे ते स्टिकी नोट्सवर लिहा. जेव्हाही तुमची नजर त्यावर पडेल तेव्हा ते व्यवस्थित रिड करू शकतील असे पाहा. महत्वाची माहिती मुलांना स्किटी नोट्सवर लिहायला सांगा.
मुलांना ब्रेक घ्यायला सांगा
जर तुम्ही सतत अभ्यास करत असाल मेंदू सुस्त होईल. म्हणून ब्रेक घेत घेत अभ्यास करायची सवय लावा. मोकळ्या हवेत अभ्यास करा. ज्यामुळे फ्रेश वाटेल.