Join us  

पावसाळ्यात मुलं अंथरुण ओलं करतात? ५ टिप्स, डॉक्टर सांगतात त्रास कमी करायचा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 4:59 PM

How To Help Your Child Stop Wetting the Bed : मुलं मोठी होतात पण झोपेत अंथरुण ओलं करण्याचा त्रास अनेकांना असतो, त्यावर उपाय काय?

लहान मुलांना अनेक चुकीच्या सवयी असतात (Parenting Tips). चुकीतूनचं मुलं शिकतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे अंथरूण ओलं करणे. मुलांच्या या सवयीमुळे अनेक पालक त्रस्त आहेत (Child). सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या दिवसात मुलं अंथरूण ओले करतात. ज्यामुळे बेडमधून कुबट गंधही येऊ लागतो (Wetting bed). मुलं ठराविक वयापर्यंत अंथरुणात लघवी करतात. पण वेळीच मुलांची ही सवयी मोडायला हवी. जर मुलं वारंवार लघवी करून अंथरूण ओलं करीत असतील तर, बालरोगतज्ज्ञ पवन मांडविया यांनी शेअर केलेल्या टिप्स फॉलो करून पाहा.

बालरोगतज्ज्ञ सांगतात, 'झोपण्यापूर्वी मुलांना कोणतेही पेय प्यायला देऊ नका. शिवाय बाथरूमला जाण्याची सवय लावा. काही मुलं झोपण्यापूर्वी बाथरूमला जाण्यासाठी नकार देतात. त्यांना आपण झोपण्याच्या २ तासानंतर उठवून बाथरूमला घेऊन जाऊ शकता. मुख्य म्हणजे घरात सकारात्मक वातावरण ठेवा. भीती किंवा नैराश्यामुळेही मुलं अंथरूणात लघवी करतात'(How To Help Your Child Stop Wetting the Bed).

मुलांनी अंथरुण ओलं करू नये म्हणून..

दालचिनी

दालचिनी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते. मुलं जर लघवी करून अंथरूण ओलं करीत असतील तर, दालचिनीची पावडर खायला द्या. यामुळे मुलं अंथरूण ओलं करणार नाहीत.

ऑलिव्ह ऑइल

व्हिटॅमिन ए आणि ओमेगा ऍसिडयुक्त ऑलिव्ह ऑईल मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त आहे. यासाठी थोडे ऑलिव्ह ऑइल घ्या, थोडेसे कोमट करा. बाळाच्या पोटावर गोलाकार हालचालीत मालिश करा. काही दिवसात फरक दिसेल.

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

आवळा

आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे मुलांचे इन्फेक्शनपासून सरंक्षण करते. तसेच पचनक्रिया आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. मूत्राशय किंवा आतड्यांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे फायदेशीर आहे. मुलं अंथरूण लघवी करून ओलं करीत असतील तर, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा आवळा पावडर मिसळा. हे पाणी मुलांना प्यायला द्या.

झोपेतून उठवा

काही मुलं झोपण्याआधी टॉयलेटला जात नाहीत. त्यामुळे झोपल्यानंतर २ तासांनी उठवा, आणि त्यांना टॉयलेटला जायला सांगा. अनेकांना वाटतं त्यामुळे मुलांची झोपमोड होईल पण काही दिवस हा उपाय केला तर मुलांचे अंथरुणात शू करण्याचा त्रास कमी होतो.

पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

घरात सकारात्मक वातावरण ठेवा

चिंता, मानसिक समस्या आणि भीती किंवा नैराश्यामुळे मुलं रात्री झोपेत अंथरूण ओले करतात. त्यामुळे मुलांसमोर सकारात्मक वातावरण ठेवा. मुलांना खूप प्रेम द्या, त्यांचं मानसिक आरोग्य जपा. 

टॅग्स :पालकत्वमोसमी पाऊसहेल्थ टिप्स