काही मुलं हसत खेळत शाळेत जातात. तर काही मुलं शाळा या नावानेच घाबरतात (School Reopens). लहान मुलांना दररोज शाळेत पाठवणे मोठे अवघड काम असते (Parenting Tips). काही मुलं शाळेत जाताना इतके रडतात की, अख्खं घर डोक्यावर घेतात (Child Fear). काही मुलांना शाळेतील वातावरणाचा आनंद घेता येत नाही. ते पालकांना मिस करू लागतात. ज्यामुळे शाळेत असूनही मुलांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते (School Anxiety).
अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलाच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं आहे. मुलं शाळेत जाताना रडत असतील तर, त्यांना ओरडण्यापेक्षा ४ गोष्टी करा. यामुळे शाळेत जाण्याची भीती मनातून निघून जाईल. क्लासमध्ये सकारात्मक वातावरणात अभ्यास करतील. शिवाय आत्मविश्वासही वाढेल(How to Help Your Child With School Anxiety at Every Age).
मुलं शाळेत जाण्यास का घाबरतात?
- अनेक वेळा मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. अपयशाची भीती त्यांना सतावत असते. अशावेळी शाळेत जाण्यापेक्षा त्यांना घर जास्त प्रिय वाटतं.
- अनेक मुलांना शाळेच्या नियमांचे पालन करण्यास त्रास होतो आणि एकटेपणा जाणवू लागतो.
- शाळकरी मुलं आपल्या मुलासोबत स्पर्धा करीत असतील. यामुळे मुलं शाळेत जणायास टाळाटाळ करतात.
- बहुतांश मुलांना असे वाटते की जेव्हा ते शाळेत जातात तेव्हा ते त्यांच्या पालकांपासून वेगळे होतील. ज्यामुळे ते शाळेत स्ट्रेसमध्ये असतात.
- अनेक वेळा शाळेत उत्तर न दिल्यामुळे टोमणे मारण्याची भीतीही मुलांच्या मनात निर्माण होते.
अशाप्रकारे मुलांच्या मनातून शाळेत जाण्याची भीती दूर करा
मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास
मुलांना मानसिकदृष्ट्या तयार करा
इंडिया पॅरेंटिंगनुसार, मुलाला शाळेत पाठवण्यापूर्वी, मुलासोबत जाऊन एकदा शाळेला भेट द्या. त्याच्या वर्ग शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी इत्यादींना आधीच भेटा. शिवाय मुलाचीही त्यांच्यासोबत ओळख करून द्या. असं केल्याने मुलांच्या मनात निर्माण झालेली भीती काहीशी कमी होईल.
दूर राहण्याची भीती त्यांच्या मनातून काढून टाका
मुलाला तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्याला शाळेत पाठवले जात आहे असे कधीही वाटू देऊ नका. मुलाला शाळेबद्दलच्या चांगल्या गोष्टी सांगा. शाळेत जाण्याचे फायदे शेअर करा. जर मूल रडत असेल तर त्याची इतर मुलांशी तुलना करू नका. इतर उदाहरण देऊन त्यांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्या.
मुलाशी बोला
मुलांसोबत नेहमी मित्रासारखं बोला. त्याला शाळेतील गमती जमती शेअर करायला सांगा. अभ्यासाबद्दल विचारा, दररोज मनोरंजक पद्धतीने मुलांकडून अभ्यास करवून घ्या. शिक्षकांशी संवाद कायम ठेवा.
मुलांचे डबे शाळेत हरवणारच नाहीत, खरेदी करा ‘नाव’ लिहिलेले टिफिन बॉक्स- यंदाचा नवा ट्रेंड
हिंमत द्या आणि स्तुती देखील करा
मुलाला त्याच्या मनात असणाऱ्या भीतीला काढण्यासाठी हिंमत द्या. जर आपले मुलं शाळेत चांगला अभ्यास करीत असेल, लोकांशी बोलत असेल, मैत्री करत असेल तर त्याचे कौतुक करा. असे केल्याने त्याला धीर मिळेल.