Join us  

शाळेत जायचं वय झालं तरी मूल बोलतच नाही? अडखळते, बोबडे बोलते..? हा आजार आहे की.. तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 12:30 PM

How to Identify Speech Delay in Children Parenting Tips : स्पीच डीले का होतो आणि तो वेळीच ओळखला तर काय फायदा होतो हे समजून घ्यायला हवे.

ठळक मुद्देथोडे दिवसांनी बोलेल असे म्हणून उपचारांना वेळ लावल्यास मात्र परिस्थिती अवघड होऊ शकते. पालकांनी वेळीच योग्य त्या उपाययोजना करुन काळजी घेतलेली केव्हाही चांगली

ऋता भिडे 

पालक, मुलांना घेऊन स्पीच थेरपीसाठी येतात तेव्हा त्यांच्या मनात खूप प्रश्न, शंका असतात. बोलता न येण्यामुळे पुढे आपल्या मुलाचं कसं होईल याबाबत पालकांच्या मनात एकप्रकारची भितीही असते. सध्या मुलांच्या पालकांना शाळेतून तुमचा मुलगा नीट बोलत नाही, तो काही ऐकूनच घेत नाही, एका जागी बसत नाही, प्रश्नाची उत्तरं देत नाही, तो काय बोलत आहे हे आम्हाला समजत नाही, इतर मुलांमध्ये खेळत नाही अशाप्रकारच्या तक्रारी येतात. खूप पालकांना मुलाला संवाद सांधता येत नाही हे शाळेतूनच समजते. पण पालकांनी जर मुलाला शाळेत पाठ्वण्याधीच याकडे लक्ष दिलं तर मुलांना सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. काहीवेळा यामुळे पालक घाबरुन जातात नाहीतर त्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे ते पाहूया (How to Identify Speech Delay in Children Parenting Tips).

(Image : Google)

सगळ्यात आधी Speech delay म्हणजे काय? ऑटिझम म्हणजे काय? हे समजून घेयला हवं. प्रत्येक मूल वेगळं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची समस्या वेगळी आहे. आपल्या मुलाला स्पीच डीले आहे का ऑटिझम आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार पालकांना उपचार घेणे सोपे जाते. स्पीच डीले झालेल्या प्रत्येक मुलाला ऑटिझम असतोच असं नाही. तसंच ऑटिझम असलेल्या प्रत्येक मुलामध्ये बोलता येत नाही असंही नाही. मुलाच्या भाषेचा विकास किती झाला आहे त्यावर हे सगळे अवलंबून असते. काही घरांमध्ये मोठ्या व्यक्ती एका भाषेत बोलतात आणि पालक मुलांशी वेगळ्या भाषेत बोलतात. किंवा मुलं एका ठराविक भाषेमध्येच स्क्रीन वरती गाणी, व्यंगचित्र ( कार्टून्स) पाहत असतात, असं होत असेल मुलांना भाषा शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. 

(Image : Google)

वयानुसार तुमचा मुलगा/ मुलगी बोलत नसेल, अडखळत बोलत असेल, वयानुसार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नसेल, घरातल्या व्यक्तीशी आणि इतरांशी डोळ्यात बघून बोलत नसेल, उच्चार स्पष्ट नसतील, वाक्यांमध्ये बोलत नसेल, शाळेमध्ये काय घडलं, कोण काय म्हणालं हे सांगत नसेल तर पालकांना मुलामध्ये स्पीच डीले आहे हे ओळखता येऊ शकतं. हे प्रत्येक मुद्दे मुलाच्या वयानुसार नुसार वेगवेगळे आहेत. अशावेळी पालकांनी डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन त्यानुसार वेळीच उपचार सुरू करणे केव्हाही चांगले. मात्र थोडे दिवसांनी बोलेल असे म्हणून उपचारांना वेळ लावल्यास मात्र परिस्थिती अवघड होऊ शकते. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं