Join us  

मुलं खूपच खराब अक्षरात लिहीतात? करा फक्त ५ गोष्टी, वळणदार-सुंदर अक्षरात लिहितील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 4:09 PM

Handwriting Skill For Children : जर तुम्हीही मुलांच्या खराब हस्ताक्षराला वैतागला असाल तर काही सोप्या टिप्स तुमचं काम करू शकतात.

मुलांचे बालपण अक्षर सुधारण्यातच निघून जातं. (Parenting Tips) अशी खूप मुलं आहेत जी बुद्धीने चतूर,  हूशार असतात पण त्यांचे हॅण्डरायटिंग खराब असते.  (Handwriting Skill For Children) घाणेरड्या अक्षरामुळे त्यांना घर आणि ट्यूशन दोन्ही ठिकाणी बोलणी ऐकावी लागतात. मुलं कधी चांगल्या अक्षरात लिहितील याचं टेंशनही आईवडीलांना असते. जर तुम्हीही मुलांच्या खराब हस्ताक्षराला वैतागला असाल तर काही सोप्या टिप्स तुमचं काम करू शकतात. (How to Improve Toddlers Handwriting)

लहान मुलांचे अक्षर कसे  सुधारायचे (Five Ways To Improve Your Child's Handwriting)

१) शब्दांवर फोकस करा

अनेकदा मुलं हॅण्डरायटिंग फक्त अशासाठी चुकीची लिहितात कारण काही शब्द त्यांना योग्य पद्धतीने लिहिता येत नाहीत. काही शब्द सरळ लिहिण्याचा प्रयत्न केल्यास त्याचं अक्षर सुधारता येईल. म, स, ए, किंवा जोडाक्षरे जे काही लिहियाला मुलांना त्रास होत असेल असे शब्द वारंवार लिहून त्याची प्रॅक्टिस करा.

२) पेन्सिलची निवड

अनेकदा मुलं आपल्या लहानश्या बोटांमध्ये मोठी पेन्सिल घेऊन बसतात. अशावेळी मुलांना पेन्सिल व्यवस्थित पकडता येत नाही. यामुळे हस्ताक्षर खराब येतं. अशावेळी पेन्सिल शार्प करून वापरा आणि रबर वापरा. पेन्सिल आणि रबर नेहमी एकत्र ठेवा. 

थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा आलाय? व्हिटामीन B-12 साठी खा ८ पदार्थ, ताकद येईल भरपूर

३) लिहिण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या

लहान मुलांना पेन्सिल पकडून तुम्ही लिहून घेत असाल तर  त्यांच्याकडून लिहण्याची योग्य पद्धत समजून घ्या. अनेकदा पेन्सिलची ग्रिप व्यवस्थित होत नाही. अशावेळी मुलं पेन्सिल घासून घासून लिहितात त्यामुळे अक्षर खराब येतं. अशावेळी मुलांना पेन्सिल पडकण्याची योग्य पद्धत शिकायला वेळ द्या आणि हलक्या हाताने लिहिण्याची योग्य पद्धत दाखवा.

४) स्पेस ठेवून लिहा

अनेकदा मुलांचे अक्षर खराब नसते पण शब्दांच्यामध्ये गॅप ठेवून न लिहिल्यामुळे अक्षर घाणेरडं दिसतं. म्हणून मुलांना स्पेस देऊन लिहिण्याची सवय लावा.  आधी मोठ्या अक्षरात लिहायला सांगा त्यानंतर छोट्या, बारीक अक्षरात लिहा. याचा सराव केल्याने त्यांचे अक्षर सुंदर दिसून येईल.

अंघोळ कशी करावी? सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात अंघोळीची योग्य पद्धत-नकारात्मकता होईल दूर

५) प्रॅक्टिस करा

लिहिण्याचा सराव करत राहिल्यास मुलांचे अक्षर आपोआप सुधारेल.  मुलांना सराव करत करत २ ते ३ पानं लिहायला सांगू नका. जर ते एका पानावर व्यवस्थित लिहित असतील तर त्यांच्यासाठी तितकंच पुरेसं असेल.  त्यांना दुसऱ्या पानावर वेगळं काहीतरी लिहायला सांगा. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य