Lokmat Sakhi >Parenting > वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

How to Improve Children's Memory (Parenting Tips in Marathi) : जर तुमची मुलं ही वाचल्यानंतरही गोष्टी विसरत असतील तर काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 10:53 AM2024-01-14T10:53:04+5:302024-01-14T12:31:28+5:30

How to Improve Children's Memory (Parenting Tips in Marathi) : जर तुमची मुलं ही वाचल्यानंतरही गोष्टी विसरत असतील तर काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात.

How to Improve Children's Memory : Top 4 Effective Ways to Improve Child's Memory Power | वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

वाचलेलं काहीच लक्षात राहत नाही? ४ गोष्टी करा; स्मरणशक्ती वाढेल, पाठ केलेलं विसरणार नाहीत मुलं

आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी पालक त्याच्या अभ्यासाची खास काळजी घेतात. काही मुलं  अभ्यासात खूप हूशार असतात तर काहींची मेमरी खूपच  कमजोर असते. (Parenting Tips) मुलं वाचलेल्या अनेक गोष्टी विसरून जातात. आदल्या दिवशी पाठांतर करतात पण परिक्षेच्या दिवशी काहीच आठवत नाही अशी अनेक उदाहरणं आहेत. (How to Improve Children's Memory)

जर तुमची मुलं ही वाचल्यानंतरही गोष्टी विसरत असतील तर काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. मुलांनी चांगला अभ्यास करावा यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स वापराव्या लागतील.   स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसंच अभ्याासात मन लागण्यासाठी तुम्हाला सोप्या ट्रिक्स वापराव्या लागतील.(Top 4 Effective Ways to Improve Child's Memory Power)

मुलांना उदाहरणं द्या

मुलांना वाचलेलं लक्षात राहत नसेल तर  मुलांना समजण्यासाठी उदाहरणांची मदत घ्या. मुलांना तुम्ही जितके जास्तीत जास्त रियल लाईफ उदाहरणं द्याल तितकं उत्तम ठरेल. कारण मुलं  त्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींची लगेच इतर गोष्टी रिलेट करतात. टॉपिक मुलांना दीर्घकाळ लक्षातही राहतात. अशा स्थितीत मुलांना नॉर्मल रिडींगपेक्षा उदाहरण देऊन समजवा.

अभ्यास इन्जॉय करा

मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही काही इंटरेस्टींग टिप्स आणि ट्रिक्सचा वापर करू शकता. यामुळे मुलांना अभ्यासाचे ओझं वाटणार नाही याशिवाय मुलांना अभ्यास करताना बोअरही होणार नाही.  मुलांना अभ्यास करायला फार आवडेल आणि तासनतास अभ्यासही करावा लागणार नाही.

भरपूर प्रोटीन असलेले ५ स्वस्त पदार्थ खा; तिशीतही दिसाल तरुण आणि फ्रेश कायम

डिकोडींग गरजेचे

अनेकदा मुलं मागचे टॉपिक्स विसरतात. अशा स्थिती मुलं अभ्यास  करायला फार इंटरेस्टेड नसतात. रिडींग करण्याव्यतिरिक्त  मुलांना पाठांतर करायला शिकवा. मुलांना टॉपिक्स लिहायला आणि ऐकवायला सुरू करतात. मुलांची रिव्हीजन घ्या.  वाचलेल्या गोष्टी मुलं अनेक दिवस विसरणार नाहीत. 

प्रोटीन-व्हिटामीनचा खजिना आहेत १ चमचा तीळ; १० आजार दूर राहतील

सतत अभ्यासाला बसवू नका

अनेकदा पालक उत्साहात येऊन मुलांना तासनतास अभ्यास करायला सांगतात. काही वेळानंतर मुलांचा मेंदू सुस्त होतो आणि मुलं टॉपिक पूर्णपणे समजू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक १ तासाला मुलांना ब्रेक द्या. त्यानंतर त्यांना फिजिकल एक्टिव्हीटी आणि पाणी पिण्याचा सल्ला द्या. ज्यामुळे मुलं रिफ्रेश होतील आणि व्यवस्थित अभ्यास करतील.

Web Title: How to Improve Children's Memory : Top 4 Effective Ways to Improve Child's Memory Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.