Join us  

पालकांच्या 3 चुका मुलांचा कॉन्फिडन्स कायमचा कमी करतात, बघा तुम्हीही नकळत असंच तर चुकत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 1:50 PM

How to Boost Confidence in Children: मुलांचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, त्यांच्यातला बुजरेपणा कमी करायचा असेल तर पालकांनी आधी स्वत:पासून काही बदल करायला पाहिजेत, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

ठळक मुद्देयामागचं नेमकं कारण पालकांना लक्षात येत नाही. पण कधी कधी पालकांच्या चुकीच्या सवयीच मुलांचा आत्मविश्वास घालविण्यासाठी कारणीभूत ठरतात.

काही मुलांचा स्वभाव मुळातच लाजरा- बुजरा असतो. चारचौघांसमोर बोलायला ते कचरतात, घाबरतात. अनोळखी व्यक्तीसमोर शांत बसून राहतात. पण त्याउलट काही मुलं (confidence in children) अशीही असतात, जी सुरुवातीला लहान वयात एकदम बिंधास्त असतात. पण वय जसं जसं वाढू लागतं, तशीतशी ही मुलं दबून राहू लागतात. हळूहळू त्यांचं मोकळं बोलणं, वागणं कमी होतं. अशा मुलांचा कॉन्फिडन्स (How to improve confidence in children?) एकदमच कमी झाल्यासारखा वाटतो. यामागचं नेमकं कारण पालकांना लक्षात येत नाही. पण कधी कधी पालकांच्या चुकीच्या सवयीच मुलांचा आत्मविश्वास घालविण्यासाठी कारणीभूत ठरतात. याविषयीचा एक व्हिडिओ डॉ. इशिना यांनी ishinna_b_sadana या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

 

पालकांच्या ३ चुका घालवितात मुलांचा कॉन्फिडन्स१. मुलांच्या चुका सतत दुरुस्त करणं..मुलांच्या चुका पालक आणि शिक्षक यांनाच सुधाराव्या लागतात, हे अगदी खरं. पण काही पालक मात्र याबाबतीत खूपच कडक असतात. मुलं चूक करणारच कारण ती लहान आहेत, ही गोष्ट ते विसरतात आणि मुलांनी अगदी मोठ्या माणसांप्रमाणे वागावं, अशी अपेक्षा करतात. प्रत्येक चूक सुधारण्यासाठी जर पालक मुलांच्या मागे लागले असतील, तर यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. उलट चुकांमधून शिकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. 

 

२. दुसऱ्या मुलांशी तुलनाआपल्या मुलाला मिळालेले गूण उत्तम की वाईट हे ठरविण्यासाठी अनेक पालक दुसऱ्या मुलांचे गूण तपासतात. आपल्या मुलांची सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करतात. यामुळे आपण इतरांपेक्षा कमी आहोत, ही भावना मुलांच्या मनात बळावू लागते.

Teachers Day : योगासनं करून मलायका अरोराने दिल्या शिक्षकांना शुभेच्छा! मलायका म्हणते..

३. मुलांना न येणाऱ्या गोष्टींची जास्त चर्चाअनेक घरांमध्ये हे चित्र दिसतं. यात मुलांना काय येतं, ते काय चांगलं करू शकतात, यापेक्षा जास्त चर्चा त्यांना काय येत नाही, याचीच होते. त्यामुळे मुलं ज्यात कमी आहेत, हे जसं सांगता, त्याच्यापेक्षा अधिक वेळा मुलं काय चांगलं करतात, हे देखील सांगा. 

 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं