आजकालची मुलं व्यवस्थित जेवत नाहीत. अगदी ३- ४ वर्षांची झाली तरी स्वत:च्या हाताने जेवत नाहीत, सगळे पदार्थ व्यवस्थित खात नाहीत, अशी बऱ्याच आईंची कायम तक्रार असते. जेवणाचं ताट घेऊन मुलांच्या मागे मागे फिरणाऱ्या आई तर आपण पाहातोच. असं आपल्या बाळाच्या बाबतीत होऊ नये आणि आपल्या बाळाला व्यवस्थित जेवायची सवय लागावी यासाठी बाळ साधारण १ वर्षाचं झालं की आईने किंवा पालकांनी मिळून त्याच्या बाबतीत काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत (how to improve eating habits of kids). त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा...( tricks and tips for the better eating habits of children)
लहान मुलांना व्यवस्थित जेवायची सवय लागावी यासाठी....
लहान मुलांना स्वत:च्या हाताने व्यवस्थित जेवायची सवय लागावी यासाठी पालकांनी काय करावं, याविषयीचा व्हिडिओ बालरोग तज्ज्ञांनी social.nagar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा..
वैद्य सांगतात 'श्रीखंड' हे सर्दीसाठी उत्तम औषध! बघा कसं खावं- नाक गळणं लगेच थांबेल
१. बाळाला जेवताना सोबत घ्या
बाळाला जेवायची सवय लागावी यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आई आणि कुटूंबातले सगळे सदस्य जेवायला बसतील, तेव्हा बाळाला सोबत घेऊन बसा. बाळाच्या समोर त्याचं ताट ठेवा आणि तुम्ही जे खात आहात, ते सगळे पदार्थ थोडे थोडे बाळाला ताटात द्या आणि त्याच्या हाताने ते खाईल तसे खाऊ द्या. सुरुवातीला ते अजिबात खाणार नाही. उलट सगळे पदार्थ सांडून ठेवून तुमचे काम वाढवेल. पण त्यामुळे त्रासून जाऊ नका. हळूहळू बरोबर ते खायला लागतील.
२. बाळासाठी वेगळे पदार्थ करू नका
मुलं सगळे पदार्थ खात नाहीत, मोजकेच त्यांच्या आवडीचे पदार्थच त्यांना लागतात, अशी तक्रार बाळ ५ वर्षांचे झाले तरी त्याची आई करतच असते. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना ते बरेच मोठे होईपर्यंत वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालता.
मंकीपॉक्स संसर्गाचा जगभर धोका वाढला, WHO म्हणते हेल्थ इर्मजन्सी; बघा लक्षणे- कशी घ्याल काळजी?
असं करणं थांबवा आणि तुम्ही जे जेवता तेच मुलांना जेवायला द्या. सुरुवातीला तिखट, मसाले कमी टाका. हळूहळू सवय होताच प्रमाण वाढवा. यामुळे मुलं वेगळं काही ना मागता जे त्यांना वाढाला ते कोणतीही तक्रार न करता शांतपणे खातील.