Lokmat Sakhi >Parenting > मुलांचं अक्षर सुंदर-वळणदार नाही? ३ गोष्टी करा, गिचमिड अक्षर होईल सुंदर-हाताला लागेल वळण

मुलांचं अक्षर सुंदर-वळणदार नाही? ३ गोष्टी करा, गिचमिड अक्षर होईल सुंदर-हाताला लागेल वळण

How To Improve Kids Handwriting : मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी  त्यांची रायटींग एक्सरसाईज करायला सुरूवात करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:42 PM2024-09-05T23:42:37+5:302024-09-06T15:43:58+5:30

How To Improve Kids Handwriting : मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी  त्यांची रायटींग एक्सरसाईज करायला सुरूवात करा.

How To Improve Kids Handwriting : Tips By Experts To Improve Handwriting | मुलांचं अक्षर सुंदर-वळणदार नाही? ३ गोष्टी करा, गिचमिड अक्षर होईल सुंदर-हाताला लागेल वळण

मुलांचं अक्षर सुंदर-वळणदार नाही? ३ गोष्टी करा, गिचमिड अक्षर होईल सुंदर-हाताला लागेल वळण

जेव्हा शाळेत जाऊ लागतात तेव्हा लिहायला पण सुरूवात सगळ्यात मोठा प्रश्न त्याचं हस्ताक्षर सुधारण्याचा असतो. मुलांचं अक्षर सुरूवातीपासूनच चांगले असेल तर पुढे जाऊन त्यांना ओरडा ऐकावा लागत नाही आणि परिक्षेत खराब अक्षरामुळे मार्क्सही कमी होत नाहीत. (Parenting Tips)  मुलांचे अक्षर खराब असेल तर शिक्षकही त्यांना वावं ठेवतात. मुलांचे अक्षर  सुधारण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. सोप्या रायटिंग व्यायामामुळे त्यांचे अक्षर सुधारू लागेल. (How To Improve Kids Handwriting)

मुलांचे अक्षर सुधारण्याासाठी टिप्स

मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी  त्यांची रायटींग एक्सरसाईज करायला सुरूवात करा. यामुळे मुलांना शब्द लिहिण्याची समज येईल.  सरदार गुरप्रीत सिंह  सीए यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून एक याबाबत अधिक माहिती शेअर केली आहे. सगळ्यात आधी ओळी असलेला पेपर घ्या. त्यावर आयताकार बॉक्स बनवा. या डब्याच्या दोन किनाऱ्यांना  एक लाईन खेचा त्यानंतर  वरच्या त्रिकोणावर एक गोळा बनवून पेन किंवा पेन्सिलला घड्याळाच्या डिशेने फिरवा नंतर  गोळे बनवत जा.


त्या खाली अजून एक डबा तयार करा त्यात तुम्ही सर्कल आपल्या इच्छेनुसार कोणत्याही दिशेत बनवू शकता. नंतर तिसरा डब्बा तयार करताना त्यातील लाईन खेचा. पूर्ण डब्ब्याला एका आकाराचा गोळा बनवत पेन चालवत राहा. हा व्यायाम रोज केल्यानं तुमची हॅण्डरायटिंग चांगली होईल.

मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी त्यांच्याकडून हा व्यायाम करून घ्या. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर स्काय टच प्रीस्कूल या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सगळ्यात आधी मुलांनी सरळ ओळ खेचली  त्यानंतर लांब आणि दुसऱ्या बाजूनं छोटी ओळ काढली. एक लाईन उजवीकडे, एक लाईन डावीकडे काढण्यात आली आहे.

मुलांना सांगतात  की पुढच्या लाईनमध्ये इंग्लिश च्या ३ लाईनवर आडवी ओळ आखा. त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये मुलांना सी शेप काढायला सांगा. त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये उल्टा सी तयार करा. पुढच्या लाईनमध्ये यू लिहीताना उलटा यू बनवा.  या व्यायामानं लिखाणात सुधारणा होऊ शकते. 

Web Title: How To Improve Kids Handwriting : Tips By Experts To Improve Handwriting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.