मुलांना कितीही चांगलं खाऊ-पिऊ घातलं तरी त्यांची हाईट काही वाढत नाही अशी समस्या अनेकांची असते. जर तुम्ही रोज योगासनं केली तर तुमच्या अर्ध्या समस्या आपोआप दूर होऊ लागतील. योग तुमच्या शरीराबरोबरच मानसिक स्थितीसाठीही उत्तम ठरतो. (Parenting Tips) मुलांच्या वाढीसाठी योगा उत्तम ठरतो. मुलांची उंची वाढत नसेल तर तुम्ही काही स्पेशल योगासनं करून मुलाची उंची वाढवू शकता. हाईट कमी असेल तर काही योगासनांच्या मदतीने मुलांना वेगाने वाढवू शकता. (3 Yogasana For Child Height Growth)
मुलांची हाईट वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असलेली योगासनं कोणती?
1) ताडासन
ताडासन हा एक उत्तम योगाभ्यास आहे. ज्यामुळे शरीराच्या मांसपेशींचा चांगला विकास होतो. यामुळे शरीर लवचीक बनते याशिवाय उंची वाढवण्यासही मदत होते. हे योगासन करण्यासाठी एका ठिकाणी उभं राहा त्यानंतर दोन्ही हात बोटांमध्ये अडकवून डोकं वरच्या बाजूने घेऊन जा. दीर्घ श्वास घ्या त्यानंतर पंजावर उभं राहून शरीर वरच्या बाजूंनी स्ट्रेच करा.
कोण म्हणतं भातामुळे पोट सुटतं? फिटनेस एक्सपर्ट सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत; फिट राहाल
2) वृक्षासन
वृक्षासन करण्यासाठी एखाद्या ठिकाणी उभं राहा आणि स्वत:ला बॅलेन्स करा. एका पायावर दुसऱ्या पायाचा गुडघा ठेवून सरळ उभे राहा. नंतर हळू हळू आपले दोन्ही हात वर नेऊन मुद्रा तयार करून होल्ड करा. काहीवेळ तसंच होल्ड करून नंतर पायांच्या खाली न्या आणि मग रिलॅक्स व्हा. ४ ते ५ वेळा हे चक्र रिपिट करा.
कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी
3) अधोमुख श्वानासन
सर्व प्रथम, मार्जरी आसनात बसा, आपले गुडघे आणि तळवे चटईवर ठेवा. आता हळू हळू आपले गुडघे वर करा आणि माउंटन पोझमध्ये जा. या आसनात तुमचे नितंब उंच राहतील आणि टाच जमिनीवर राहतील. हात सरळ ठेवा. अशा प्रकारे शरीरात अनेक ठिकाणी ताण येईल. आता ५ वेळा दीर्घ श्वास घ्या आणि पहिल्या आसनात या. हे आसन ४ ते ५ वेळा करा. याशिवाय आहारात कॅल्शियम, प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा.