मुलांना कोणत्यावेळी काय शिकवायचं हे समजणं इतकं सोपं नाही. आई वडिलांना नेहमी असं वाटतं की त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत. (How To Increase Kids IQ Level) मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची आई-वडिलांची तयारी असते. आई वडील मुलांना चांगल्या शाळेतही घालतात, त्यांच्यासाठी गरजेच्या असणाऱ्या चांगल्या सुविधा त्यांना देतात. (Easy Ways To Increase Your IQ Levels)
इनडीड करिअर एडव्हाईस युकेच्या रिपोर्टनुसार मुलांचा आयक्यू वाढवण्यासाठी त्यांना म्युझिकल इंस्टूमेंट वाजवायला शिकवा, नवीन भाषा शिकवा, पुस्तकं वाचण्याची सवय लावा.मुलांना नातेसंबंध कसे टिकवायचे हे सुद्धा शिकवा (Ref). मुलांची लाईफस्टाईल हेल्दी असेल याची काळजी घ्या. मुलांकडून मेमरी एक्टिव्हीज करून घ्या, उदा, कोडं सोडवणं, कार्ड गेम्स, पजल गेम. जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती वाढेल.
मुलांना चांगल्या सुखसुविधा दिल्यानंतरही त्यांना करियरमध्ये समस्यांचा सामना करावा लागत असेल, त्यांना नोकरी मिळत नसेल तर आई वडिल हताश होतात. भरपूर फॅसिलिटीज मुलांना पुरवूनही त्यांची शिकण्याची आणि समजण्याची कपॅसिटी कमी होत आहे. त्यांची इंटेलिजेंस पॉवर म्हणजेच आयक्यू लेव्हल कमी होत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण शरीरात न्युट्रिशन्सची कमतरता हे असू शकतं.
रिपोर्टनुसार जगभरात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 15 कोटी मुलांना मेंटेल फिजिकल ग्रोथमध्ये कुपोषणाचा सामना करावा लागत आहे. त्यांची आय क्यू लेव्हल 15प्वाईंट्सनी कमी झाली आहे. गरिब देश किंवा गरीब कुटूंबातील मुलांमध्ये डिफिशियंसी जाणवल्यास गोष्ट वेगळी आहे पण मोठ्या घरातल्या मुलांमध्येही मालन्युट्रिशनची समस्या वाढत आहे. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकिच्या स्वयींमुळे हे वाढले आहे.
पन्नाशीनंतरही तरूण दिसायचंय? मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन पाहा, कायम पंचविशीतले दिसाल
आयर्नची कमतरता भासल्यास मुलांची हाडं खराब होऊ शकतात. शुगर, हायपरटेंशन, हार्ट प्रोब्लेम, आर्थरायटिस, मायोपिया, वर्कआऊट, न्युट्रिशन, ग्रोथ हॉर्मोन, झोपेचे पॅटर्न,पोश्चर, इम्यूनिटी हे आजार अन्हेल्दी लाईफस्टाईलमुळे होऊ शकतात.
मुलांची बुद्धी आणि उंची वाढवण्यासाठी काय खायला द्यावे?
रामदेव बाबा सांगतात मुलांची उंची वाढवण्यासाठी गाजर, मेथी, सोया, डेअरी प्रोडक्ट, जवसाचे पीठ खायला द्या. ३० मिनिटं योगा करा, जंकफूड बंद करा, अर्धा तास उन्हात बसा, हिरव्या भाज्या, फळांचा आहारात समावेश करा. घरचं जेवण मुलांना खायला द्या, फळं, भाज्यांचे प्रमाण वाढवा, योगा करा. स्क्रिन टाईम कमी, सोशल मीडियापासून दूर राहणं, सकाळी लवकर उठणं या सवयी मुलांना लावा.