Join us  

सुटीत मुलं सतत टीव्ही- मोबाईल बघतात? ५ गोष्टी करा, मुलं स्क्रिनपासून राहतील लांब आनंदाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 1:11 PM

Parenting Tips: सुटीत मुलं सतत टीव्ही, माेबाईल, लॅपटॉप बघत बसत असतील तर त्यांचा स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(How to keep children away from TV mobile screen?)

ठळक मुद्देमुलांचं टीव्ही, मोबाईल पाहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या काही गोष्टी करून पाहा. 

मुलांची उन्हाळी सुट्टी म्हणजे घरात नुसता दंगा.. आजुबाजुची मुलं जमणार आणि कुणाच्या तरी एकाच्या अंगणात सगळेजण धमाल करणार असं उन्हाळी सुट्टीचं (summer vacations) चित्र काही वर्षांपुर्वी घराघरांत दिसून यायचं. पण आता मात्र बहुतांश घरातली मुलं निव्वळ मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात सुटी वाया घालवत आहेत. या दोन गोष्टी बंद केल्या तर मुलं कंटाळतात, वैतागतात आणि मग पालकांनाच त्रास द्यायला सुरुवात करतात. असं सुटीत सतत स्क्रिनसमोर बसलं तर मुलांना चष्मा लागेल, असं टेन्शनही आई- बाबांना येतं (How to keep children away from TV mobile screen?). म्हणूनच तर मुलांचं टीव्ही, मोबाईल पाहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या काही गोष्टी करून पाहा. 

 

मुलांचं टीव्ही- मोबाईल पाहण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी टिप्स...

१. लहान मुलंच आहेत ती. त्यामुळे टीव्ही, मोबाईल यांचं आकर्षण त्यांना वाटणारच. त्यामुळे दिवसातला एखाद्या तासाचा वेळ त्यांना टीव्ही पाहण्यासाठी द्या. मोबाईल देणं मात्र टाळा. दिवसभरात नेमका कधी टीव्ही पाहायचा आहे, हे त्यांचं त्यांनाच ठरवू द्या.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

२. घरातल्या छोट्या मोठ्या कामांत मुलांना सोबत घ्या. एरवी मुलांना मोठ्या माणसांच्या अनेक घरगुती कामात लुडबूड करण्याची सवय असते. पण आपणच मुलं पसारा करतील, गोंधळ घालतील म्हणून आपल्या सोबत घेत नाही. अशी तुमच्या मुलांच्या आवडीची कामं कोणती ते ओळखा आणि त्या कामात त्यांना साेबत घ्या. यातून मुलांना काम व्यवस्थित करण्याची सवयही लागते.

 

३. तुमच्या घराच्या अगदी जवळ जर एखादं दुकान, भाजीविक्रेता असेल तर मुलांना त्यांच्या मित्रांच्या साेबतीने दुकानातून एखादी वस्तू किंवा भाजी आणण्यासाठी पाठवा.

तामिळनाडूचा प्रसिद्ध 'गोधुमा' डोसा, तांदूळ भिजवण्याचीही गरज नाही, बघा झटपट होणारी खास रेसिपी 

१० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसोबतच हा प्रयोग करा. यामुळे मुलांचा वेळही जाईल आणि आपण घरातलं एक महत्त्वाचं काम केल्याचा आनंदही वाटेल.

 

४. झाडांना पाणी घालणे, अंथरुण- पांघरुणाच्या घड्या घालणे, घरातल्या लहान कपड्यांच्या घड्या घालणे अशी छोटीमोठी कामं त्यांना सांगा. भरपूर वेळ घेऊन मुलांनी त्यांच्या सवडीने कामं केली तरी चालेल. सुरुवातीला त्यांच्याकडून खूप चांगल्या कामांची अपेक्षा ठेवू नका. आपल्याला ती फक्त त्यात गुंतून राहाणं आणि त्यातून त्यांना कामाची सवय लागणं अपेक्षित आहे. 

फक्त १ चमचा हळद केसांवर करेल कमाल, केस होतील दाट- लांब, बघा कसा करायचा वापर

५. मुलांना पुस्तक वाचण्याची, चित्रकलेची, संगीताची किंवा अन्य कशाची आवड आहे ते ओळखा आणि त्यानुसार त्यांना वेगवेगळे साहित्य आणून द्या.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंसमर स्पेशलमोबाइल