मुलांचे हस्ताक्षर सुधारणं हे पालकांसाठी खूप कठीण काम असते. खासकरून मुलांचे लक्ष मोबाईल आणि टिव्हीकडे जास्त असते. अशा स्थितीत लिहिताना अलर्ट राहायला हवं. अशा स्थितीत मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी तुम्ही पेन एक्सरसाईज करू शकता. रोज २ मिनिटांचा पेन व्यायाम केल्यानं १० दिवसांच्या आत अक्षरांत बदल दिसेल. व्यायाम केल्यानं मुलांच्या हातांची पकड मजबूत राहते. याशिवाय लिहिण्याची गती वाढते आणि अक्षर स्पष्ट दिसते. या एक्टिव्हीजमुळे मुलांची एकाग्रात वाढते. (How To Know Signs And Symptoms Of Iron Deficiency Anemia Causes Treatment And Prevention)
अंडरस्डूड.अर्गच्या रिपोर्टनुसार मुलांचे अक्षर सुधारण्यासाठी पेन्सिलची ग्रिप योग्य आहे की नाही ते पाहा, पानांवर रेषा आखून नंतर त्यावर मुलांना लिहण्याचा सराव करायला सांगा. आपल्या मुलांच्या वर्गशिक्षिकांशी याबाबत बोला. लिहीताना रायटिंगचा पॅडचा वापर करा, मुलांना इतर मुलांचे हॅण्ड रायटिंग तपासून पाहायला सांगा. लिहिताना मुलं कोणत्या स्थितीत बसतात ते पाहा. पोश्चर व्यवस्थित असेल तर लिहीताना इतर समस्या येत नाहीत.
सगळ्यात आधी एक वहीचं साधं पेज घ्या. नंतर एक आयताकार बॉक्स बनवा त्यानंतर दोन्ही किनाऱ्यांना एक सरळ रेषा काढा, वरच्या त्रिकोणावर एक मोठा गोल तयार करत पेनाला क्लॉक वाईज फिरवत राहा नंतर दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जा. या पद्धतीनं त्रिकोनात गोल आकार तयार करा.
नंतर एक आयताकार बॉक्स बनवून त्यावर उलट्या दिशेनं त्रिकोण काढा. यात त्रिकोनानं एंटी क्लॉक वाईज गोल आकार तयार करा आणि दुसरीकडे न्या. दुसऱ्या बाजूला त्रिकोण गोलाकार शेपमध्ये बनवा. छोटा कोन गोल आकारात बनवा, नंतर छोटे कोन तयार करत गोल मोठे बनवा.
दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल
एका पानावर डॉटस तयार करा आणि हे डॉट्स जोडत एक सरळ लाईन तयार करा. वेगवगेळ्या आकारात पेनानं लिहा. पेनाबरोबरच एक सरळ रेष ओढा. एखादे अक्षर काढून पुन्हा पुन्हा त्याच अक्षराला गिरवण्यास सांगा. या छोट्या छोटया एक्सरसाईजनं मुलांचे हस्ताक्षर कमीत कमी वेळात सुधारेल.