Join us  

जया किशोरी सांगतात मुलांना फक्त 'ही' गोष्ट सांगा, ते तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपविणार नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2024 2:39 PM

Parenting Tips: मुलांनी तुमच्यापासून कधीच कोणत्या गोष्टी लपवून ठेवू नयेत, असं वाटतं ना, मग ही एक गोष्ट न चुकता त्यांना सांगा... (simple Ways to Strengthen a Parent-Child Relationship)

ठळक मुद्देअमूक एक गोष्ट आपल्या पालकांपासून लपवून ठेवली पाहिजे, असं त्यांना कधीही वाटणार नाही. एखाद्यावेळी करून बघा हा प्रयोग..  

मुलांनी चुका करायच्या, गोंधळ घालायचा आणि पालकांनी त्यांना ओरडायचं, त्यांच्या चुका माफ करायच्या, कधी मुलांवर ओरडायचं तर कधी त्यांना प्रेमाने सांगायचं.. हे असं प्रत्येक पिढीत चालूच आहे. कोणतीच पिढी त्याला अपवाद असू शकत नाही. पण हे सगळं एका मर्यादेपुरतं असेल तर ठिक आहे. पण यातल्या कोणत्याच गोष्टीचा कधीच अतिरेक मात्र व्हायला नको. मुलांचं आणि पालकांचं नातं वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर मित्रत्वाचं व्हायला हवं. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या नात्यात एकमेकांशी स्पष्टपणे बोलण्याचा, चुकांची कबुली देण्याचा मोकळेपणा हवा. तो तुमच्या नात्यात कसा आणायचा, याविषयी जया किशोरी यांनी एक छानशी सोपी गोष्ट सांगितली आहे. (simple Ways to Strengthen a Parent-Child Relationship)

 

हल्ली बऱ्याचदा आपण असं बघतो की मुलं त्यांच्याकडून झालेली एखादी चूक त्यांच्या पालकांना सांगायला घाबरतात. त्यांच्यापासून ती लपवून ठेवतात. कारण आपल्याकडून झालेली चूक पालकांना समजली तर ते आपल्याला काय करतील अशी भीती त्यांच्या मनात असते.

फक्त अर्ध्या तासांत तयार होईल २५- ३० लोकांची शेवभाजी- बघा झणझणीत भाजीची खास रेसिपी

त्यामुळे मुलं त्यांच्या चुका पालकांसमोर कबुल करत नाहीत. पण बऱ्याचदा असंही होतं की ती अमूक एक चूक पालकांपासून लपवणं मुलांना खूप महागात पडतं. आपण वेळीच हे आपल्या पालकांना सांगायला हवं होतं, असं वाटू लागतं. अशी परिस्थिती तुमच्या मुलांवर येऊ द्यायची नसेल तर तुमच्या मुलांच्या मनात तुमच्याविषयी विश्वास निर्माण करा.

 

तु तु्झ्या पद्धतीने काम कर. व्यवस्थित लक्ष ठेवून पाऊलं टाक. प्रत्येक गोष्ट विचारपुर्वक कर अशी सूचना पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना नक्की द्या. पण त्यासोबतच त्यांना असाही विश्वास द्या की एवढी काळजी घेऊनही तुझ्याकडून काही चुकलंच तरी घाबरू नको.

आहारतज्ज्ञ सांगतात ड्रायफ्रुट्स खाण्याआधी 'ही' गोष्ट करा- अन्यथा तब्येत बिघडण्याचा धोका

तु थेट माझ्याकडे ये. मी तुझ्यासोबत आहे. यानंतर त्यांच्याकडून एखादी चूक झाली तरी ते सगळ्यात आधी तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला सगळं काही विश्वासात घेऊन सांगतील. अमूक एक गोष्ट आपल्या पालकांपासून लपवून ठेवली पाहिजे, असं त्यांना कधीही वाटणार नाही. एखाद्यावेळी करून बघा हा प्रयोग..

  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं