मुलांना जेव्हाही अभ्यास करायला सांगितलं जातं तेव्हा त्यांना झोप येतेय, कंटाळा आला, पोटात दुखतंय अशी कारणं देतात. अभ्यासाला बसायच्यावेळीच त्यांना झोप येऊ लागते तर कधी वॉशरूमला जायचं असतं. मुलांनी पूर्ण दिवस नाही तर निदान १ ते २ तास तरी मन लावून अभ्यास करावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. (Mulanni abhyas karava yasathi kay karayche)
सगळ्याच मुलांना अभ्यासाची गोडी असते असं नाही. अशावेळी मुलांना शिस्त लावण्याासाठी काय करावं असा प्रत्येक पालकाला पडतो. (4 ways parents can help children build study habits) काही बेसिक पॅरेंटीग टिप्स तुमचा हा प्रश्न सोडवण्यात मदत करतील. ज्यामुळे मुलाचं अभ्यासत मन लागेल. (How to Make Your Child Interested in Studying)
१) आपल्या मुलांची इतर मुलांबरोबर तुलनात करू नका
अनेक पालक आपल्या मुलांची इतर मुलांसह तुलना करतात. असं करण चुकीचं आहे कारण यामुळे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांना असं वाटतं की आपण चांगला अभ्यास करू शकत नाही. म्हणून मुलांना नेहमी मोटीवेट करत राहा.
पुरणपोळी ना फाटणार, ना पुरण बाहेर येणार; पोळी लाटण्याची सोपी पद्धत-परफेक्ट बनेल पोळी
२) अभ्यासाचे जास्त प्रेशर नको
मुलं तर अभ्यास करत नसतील तर त्यांना जास्त प्रेशराईज करू नका. यामुळे त्यांच्या डोक्यात नेहमी अभ्यासाबद्दल भिती असेल व्यवस्थित अभ्यास करू शकणार नाहीत.
३) एक रूटीन ठरवून द्या
चांगल्या अभ्यासासाठी एक व्यवस्थित रुटीन बनवणं फार महत्वाचं असतं. यामुळे मुलांना शिस्त लागेल आणि ते आपली कामं वेळेवर करू शकतील. सुरूवातीला मुलांना जास्तवेळ अभ्यासाला बसवू नका आधी कमी वेळ बसवून नंतर हळूहळू वेळ वाढवा.
रात्रीच्या उरलेल्या खिचडीचा करा कुरकुरीत डोसा; झटपट बनेल नाश्ता-पाहा एकदम सोपी रेसिपी
४) त्यांचे लक्ष विचलित होईल अशा वस्तू दूर ठेवा
मुलं मन लावून अभ्यास करत नसतील तर यासाठी मोबाईल, खेळणी इतर वस्तू जबाबदार असू शकतात. म्हणून अभ्यासाच्या वेळेपुरता मोबाईल, खेळणी मुलांपासून दूर ठेवा. मुलांच्या निगेटिव्ह पॉईंट्सवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गोष्टींवर फोकस करा. यामुळे मुलांचा उत्साह वाढेल आणि मुलं ताण न घेता अभ्यास करतील.