Lokmat Sakhi >Parenting > मुलं वाचलेलं लगेच विसरतात? ५ गोष्टी करा, वाढेल स्मरणशक्ती -धडेच्या धडे होतील पाठ

मुलं वाचलेलं लगेच विसरतात? ५ गोष्टी करा, वाढेल स्मरणशक्ती -धडेच्या धडे होतील पाठ

How To Make Your Child Interested In Studying : मुलं धावण्याआधी उभं राहायला शिकतात मग चालायला शिकतात. तसचं मुलं सुरूवातीलाच जास्त अभ्यास करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:34 PM2024-02-14T12:34:01+5:302024-02-14T16:29:35+5:30

How To Make Your Child Interested In Studying : मुलं धावण्याआधी उभं राहायला शिकतात मग चालायला शिकतात. तसचं मुलं सुरूवातीलाच जास्त अभ्यास करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका.

How To Make Your Child Interested In Studying : Most Effective Tips To DevelopYour Childs Interest in Studies | मुलं वाचलेलं लगेच विसरतात? ५ गोष्टी करा, वाढेल स्मरणशक्ती -धडेच्या धडे होतील पाठ

मुलं वाचलेलं लगेच विसरतात? ५ गोष्टी करा, वाढेल स्मरणशक्ती -धडेच्या धडे होतील पाठ

बरेच पालक  आपल्या मुलं व्यवस्थित अभ्यास करत नाहीत यासाठी त्रस्त असतात. मुलांना अभ्यासाला बसवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणं पालकाचे सुरू असते.  कारण व्यवस्थित अभ्यास करून यश मिळवलं तरच मुलांचे भविष्य चांगले राहते. (Most Effective Tips To Develop Your Childs Interest in Studies) काही सोप्या टिप्स तुमचं काम अधिकच सोपं करू शकतात. ज्यामुळे मुलांचे अभ्यासात मन लागेल आणि एस्क्ट्रा करीक्युलर एक्टिव्हिटीज कमी  करण्यास मदत होईल. (How To Make Your Child Interested In Studying)

करिअर इंडियाच्या रिपोर्टनुसार प्रत्येक मुलाची  व्यक्तीमत्व,  शिकण्याची क्षमता आणि स्वारस्ये वेगवेगळी असतात. ज्यामुळे तुम्ही मुलांना सतत काही ना काही शिकवण्यात आणि अभ्यासात गुंतवून ठेवण्याचे मार्ग शोधून ठेवायला हवेत. मुलं धावण्याआधी उभं राहायला शिकतात मग चालायला शिकतात. तसचं मुलं सुरूवातीलाच जास्त अभ्यास करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका. हळूहळू अभ्यास करण्याची सवय लावा. 

मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर काय करावे?

1) सगळ्यात पहिलं म्हणजे अभ्यास करण्यासाठी मुलांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका. काही  आई वडील अभ्यास केला नाही म्हणून मुलांवर हात उचलतात ज्यामुळे मुलं हट्टी आणि जिद्दी बनतात. मुलांना प्रेमाने समजावून त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या. जेणेकरून त्याचे अभ्यासात मन लागेल.

कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद

2) मुलांकडून रोज योगासन करून घ्या. ज्यामुळे त्यांचे माईंड शार्प राहील. यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होईल आणि मुलांचा मेंदूही वेगाने चालेल.

3) मुलांना कोणत्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे, कोणत्या विषयांचा अभ्यास करायला  जास्त आवडते याची माहिती करून घ्या.  यातून तुम्हाला मुलांना इंटरेस्ट दिसून येईल. असे केल्याने मुलांचे अभ्यासात मन लागेल.

स्लिम फिगर हवीये-प्रोटीन खाणं महाग वाटतं? १० रुपयांत वाटीभर चणे खा, भरपूर प्रोटीन मिळेल-फिट राहाल

4) मुलं आपल्या आई वडिलांकडून नेहमीच शिकत असतात. मुलांनी आपल्यासारखे वागावे असं वाटत असेल तर नेहमी चांगले वागा आणि मुलांकडून चांगला अभ्यास करून घ्या. ज्यामुळे त्यांना नवीन दिशा मिळेल आणि मुलं कॉन्फिडेंट दिसतील.

5) मुलांना नेहमीच नवीन गोष्टी शिकवण्यासाठी मोटिव्हेट करत राहा. यासाठी त्यांना नवनवीन गेम शिकवा. एक्टिव्हीज शिकवा तसंच स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. यामुळे मुलं पॉझिटिव्ह राहतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

Web Title: How To Make Your Child Interested In Studying : Most Effective Tips To DevelopYour Childs Interest in Studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.