आपली मुलं-हूशार, चाणाक्ष व्हावीत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. यासाठी मुलांनी मेंटली स्ट्राँग राहणं खूप महत्वाचे असते. (Parenting Tips) आपल्या मुलांना मानसिकरित्या स्ट्राँग बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात तर काहीजण हेल्दी डाएट घेतात. ८ बेसिक टिप्स रोजच्या जीवनात फॉलो केल्या तर मुलं स्ट्राँग होण्यास मदत होईल. (How to Make Your Child Mentally Smart And Intelligent)
१) मुलांनी हुशार व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना मोकळेपणाने बोलायला शिकवा. तसंच त्यांना आपल्या भावना एक्सप्रेस करायला शिकवा. मुलांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता यायला हवं. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी डिप ब्रिदींग आणि माईंडफुलनेसबाबत शिका.
२) मुलांना समस्यांपासून पळण्यापेक्षा प्रोब्लेम्स सोडवण्यासाठी प्रोत्साहन द्या. मुलांमध्ये प्रोब्लेम सॉल्विंग स्किल्स विकसित होतील आणि तेज बनतील.
३) मुलांना आपले नकारात्मक विचार बदलण्यास सांगा. मुलांना जास्तीत जास्त सकारात्मक विचार करायला प्रोत्साहन द्या. मुलांनी चांगले विचार केले तर त्यांच्या जीवनात येणार चढ-उतार कमी होण्यास मदत होईल.
४) मुलांना मानसिकरित्या स्ट्राँग बनवण्यासाठी त्यांच्यासोबत काही फॅमिली एक्टिव्हीटीज करा. बोर्ड गेम खेळा त्यानंतर त्यांच्यासोबत आऊडडोअर ट्रिपसाठी जा.
५) शरीर आणि मेंदू यांचा योग्य ताळमेळ राहण्यासाठी मुलांना फिजिकल एक्टिव्हीज शिकवणं फार महत्वाचे आहे. अशावेळी मुलांसाठी मेंटल आणि फिजिकल ग्रोथ महत्वाची असते. मेंटल स्ट्रेंथ बुस्ट करण्यासाठी व्यायाम करणं फार महत्वाचे आहे. ज्यामुळे कॉग्निटिव्ह फंक्शन, इमोशनल रेग्युलेशन, फिजिकल हेल्थमध्ये सुधारणा होते. मुलं फिजिकल फिटनेसला प्रायोरिटी देतात.
दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही
६) नेहमी स्पर्धा परिक्षांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत करा. ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. मुलं स्वत:ची कामं स्वत: करतील याचे प्रोत्साहन द्या. काम चुकीचं केलं तरी मुलं त्यातून काहीतरी शिकतील आणि जबाबदारीची भावना विकसित होईल.
७) मुलांनी भरपूर झोप घेतली नाही, चांगलं हेल्दी डाएट घेतलं नाही तर त्यांचा फिजिकली आणि मेंटली विकास होणार नाही. त्यांनी हेल्दी खाण्यापिण्याच्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
मोगऱ्याला फुलंच नाही, रोप सुकलंय? मातीत हा पदार्थ घाला, भरगच्च मोगरे येतील-सुगंधाने बहरेल घर
८) रेग्युलर व्यायाम केल्याने शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना सायकलिंग, मैदानी खेळ असा फिजिकल एक्टिव्हीटीजची सवय लावा.