Join us  

मुलं अजिबात ऐकत नाहीत-हट्टीपणा करतात? एक्सपर्ट सांगतात १ उपाय- मुलं ऐकतील- गुणी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 2:46 PM

How To Get Your Toddler to Listen to You: बरीच मुलं अशी आहेत जी खूप हट्टीपणा करतात. आई- बाबांचं अजिबात ऐकत नाही. मुलांच्या वागण्याने वैतागला असाल तर हा एक उपाय करून पाहा...(How to discipline a child that won't listen?)

ठळक मुद्देअसं जर नियमितपणे केलं तर साधारण १ ते दिड महिन्यात मुलाच्या वागणुकीवर एकदम चांगला परिणाम दिसून येतो. मुलांच्या वागण्यात खूप फरक पडतो.

हल्लीची मुलं अतिशय तापदायक झाली आहेत, अशी तक्रार मुलांच्या पालकांची नेहमीच असते. मुलं ऐकत नाहीत, थोडं मनाविरुद्ध झालं की लगेच चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, हव्या त्या वस्तू मिळाल्या नाहीत की आरडाओरडा करतात किंवा अभ्यासातही खूप लक्ष देत नाहीत, अशी तक्रार बऱ्याच मुलांच्या पालकांची नेहमीच असते. मुलांचं असं वागणं वाढलं की मग त्यांच्या आई- बाबांचीही त्यांच्यावर चिडचिड होते आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही (How to discipline a child that won't listen?). म्हणूनच अशावेळी काय करावं आणि मुलांनी तुमचं सगळं ऐकावं, गुणी व्हावं, अभ्यासातही प्रगती करावी यासाठी पालकांनी काय करावं, याविषयीची माहिती डॉक्टरांनी एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. (how to make your stubborn child to listen to you without a fight?)

 

बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तेव्हा आई किंवा वडील पोटावर हात ठेवून जे काही बाळाशी बोलतात, ते बाळ ऐकतं असतं असं विज्ञान सांगतं. त्यामुळे गर्भारपणात आईने तिच्या बाळाशी सतत संवाद साधायला हवा, असं म्हटलं जातं. थोडंफार तेच लॉजिक डॉ. मिकी मेहता यांनी सांगितलं आहे.

सेलेना जेटली म्हणते लहानपणीच आला खूप घाणेरडा अनुभव पण तरीही 'ते' निर्दोष आणि मी मात्र.... 

ते म्हणतात की रात्री तुमचं मूल झोपलं की त्यानंतर साधारण पुढचा १ ते २ तास ते सबकॉन्शियस माईंडमध्ये असतं. यावेळी त्यांचा मेंदू सगळं ऐकत असतो. त्यामुळे यावेळी तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्याच्या कानात सांगा की तु खूप हुशार, शहाणा आहेस, तुला आता गुणी व्हायचं आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, तु अजिबात हट्टीपणा करत नाहीत, सगळं ऐकतोस.. असं सगळं सकारात्मक बोला.. 

 

असं जर नियमितपणे केलं तर साधारण १ ते दिड महिन्यात मुलाच्या वागणुकीवर एकदम चांगला परिणाम दिसून येतो. मुलांच्या वागण्यात खूप फरक पडतो. काही दिवस हा प्रयोग नक्की करून पाहा, याच्यामागे विज्ञान आहे.

डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ सांगतात २ सोप्या टिप्स- शुगर वाढणार नाही

कारण सबकॉन्शियस माईंडमध्ये जे काही चालू असतं, ते मुलं कधीच विसरत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात.. हा उपाय केल्याने कोणतंही नुकसान होणार नाही हे नक्की. त्यामुळे काही दिवस हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं