Join us  

मुलांचं स्क्रीनचं वेड कमी करण्यासाठी झगडताय? ४ उपाय, स्क्रीन टाइम कमी करायचा तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 11:50 AM

How to manage screen time in kids : स्क्रीनमुळे घरात सतत वाद, भांडणं होत असतील तर काही गोष्टींकडे आधीपासूनच नीट लक्ष द्यायला हवे...

मुलं एकदा टिव्ही किंवा मोबाइलसमोर बसली की त्यांना त्यापासून दूर करणे हा असंख्य पालकांपुढील एक महत्त्वाचा टास्क असतो. हल्ली प्रत्येकाच्याय हातात मोबाइल आणि समोर विविध प्रकारच्या स्क्रीन असल्याने त्याला पर्याय नाही हे खरे आहे. पण सध्या लहान वयात मुलांना या स्क्रीनचे किती वेड असते ते आपण पाहतो. मुलांच्या समोर एकजा स्क्रीन आला की त्यापासून लांब होणे फार अवघड असते. पालकही अनेकदा मुलांना स्क्रीनपासून लांब होण्यासाठी झगडताना दिसतात.  काहीवेळा मुलांना या स्क्रीनचे इतके व्यसन लागते की अजिबात ऐकत नाहीत त्यामुळे घरात आरडाओरडा, प्रसंगी मुलांना मारणे, मग होणारी रडारडी असे सगळे होते. पण हे सगळे टाळायचे असेल आणि मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवायचे असेल तर काही गोष्टींकडे पालक म्हणून आपण आवर्जून लक्ष द्यायला हवे (How to manage screen time in kids). 

१. टाइम लिमिट सेट करणे

मुलांना स्क्रीन पाहायला किती वेळ परवानगी आहे याचे एकदाच एक टाइम टेबल सेट करुन घ्या. हा वेळ किती असेल हे मुलांशी बोलून आधीच ठरवा. हा वेळ अर्धा तास, पाऊण तास किंवा एक तास असा कितीही असू शकतो. एकदा वेळ नक्की केला की त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही हे मुलांना समजवा. त्यामुळे स्क्रीन टाइम लिमिट सेट होण्यास मदत होईल. 

(Image : Google)

२. रुटीन तयार करा

मुलांनी स्क्रीन कधी पाहायचा याचे एक रुटीन सेट करा. जर मुलं शाळेतून आल्यावर कंटाळली असतील. संध्याकाळच्या वेळी शाळा, अभ्यास करुन त्यांना कंटाळा आला असेल तर त्यावेळी एक ठराविक वेळ रोज ते स्क्रीन पाहतील असे ठरवा. त्यामुळे मुलांनाही आपल्याला अमुक वेळेला स्क्रीन पाहायचा आहे हे समजेल.

३. अलार्म क्लॉक लावा

मुलं टीव्ही किंवा स्क्रीन पाहायला बसली की बाजूला एक अलार्म क्लॉक लावा. ज्यामुळे त्यांची वेळ संपली की अलार्म वाजेल आणि आता आपली वेळ संपली हे मुलांना समजेल. अलार्ममुळे आपल्यालाही मुलांना वेळ संपल्याचे सांगावे लागणार नाही. 

४. हट्टाला बळी पडू नका

मुलं त्यांचा ठरलेला वेळ संपल्यावर आणखी वेळ स्क्रीन पाहण्यासाठी खूप हट्ट करतील. रडापडी करुन जास्तीच्या स्क्रीनटाइमसाठी खूप काही करायचा प्रयत्न करतील. अशावेळी पालक म्हणून आपण काहीवेळा पिघळतो आणि त्यांचे म्हणणे मान्य करतो. पण असे केल्याने मुलांना आपल्याकडून एखादी गोष्ट कशी करुन घ्यायची ते नेमके समजते. 

  

टॅग्स :पालकत्वमोबाइल