'आई गं बोअर होतंय...' हे वाक्य सध्या घरोघर ऐकायला मिळत आहे.. त्याचं कारण म्हणजे मुलांना लागलेली उन्हाळी सुटी. शाळा सुरू असली की शाळा, क्लास, ट्युशन असं सगळं मुलांचं रुटीन ठरलेलं असतं. त्या रुटीनमधून इकडे- तिकडे पाहायला त्यांना पुरेसा वेळसुद्धा नसतो. मग अशावेळी जेव्हा त्यांना सुट्ट्या लागतात तेव्हा काही जणांना अगदीच रिकामं झाल्यासारखं वाटतं. कारण बऱ्याच मुलांना तर हल्ली शेजारीपाजारी खेळायलाही कोणीच नसतं. अशावेळी मग बहुतांश मुलं त्यांचा जास्तीतजास्त वेळ मोबाईल, टीव्ही पाहण्यात घालवतात. आपल्याला माहितीच आहे की मुलांसाठी हे खूप चुकीचं आहे (how to minimize screen time of kids in summer vacation?). त्यामुळेच मुलांची उन्हाळी सुटी सत्कारणी लागावी आणि त्यांचं स्क्रिन पाहण्याचं प्रमाण कमी व्हावं (how to entertain kids in summer vacation?), यासाठी या काही गोष्टी करून पाहा.(creative and innovative activities for kids in summer)
उन्हाळी सुटीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर कसं ठेवावं?
१. उन्हाळी सुटी असली तरी मुलांच्या उठण्याच्या, झोपण्याच्या, खेळण्याच्या वेळा ठरवून टाका. त्यामध्ये त्यांच्या सोयीनुसार त्यांना विचारून त्यांचा टीव्हीचा आणि मोबाईलचा वेळही ठरवून टाका. या वेळेव्यतिरिक्त इतर वेळ टीव्ही, मोबाईल पाहिलेला अजिबात चालणार नाही हे त्यांना ठासून सांगा. यामुळे आपोआपच स्क्रिन टाईमवर नियंत्रण येते.
पोटाचे आजार वाढण्याची ५ मुख्य कारणं- जेवण झाल्यानंतर ९० टक्के लोक 'या' चुका करतात
२. झाडांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, भाजी निवडणे अशा छोट्या छोट्या कामात मुलांना तुमच्यासोबत घ्या. त्यांना ही कामं शिकवा. सुरुवातीला त्यांना ते जमणार नाही. पण त्यांचा इंटरेस्ट टिकवून ठेवण्यासाठी ते करतील तसे करू द्या. ते काम परफेक्टच व्हायला हवे अशी अपेक्षा ठेवून त्यांना ओरडू नका.
३. उन्हाळी सुटीमध्ये मुलांची वाचनाची सवय वाढण्यासाठीही प्रयत्न करा. कारण इतरवेळी अभ्यासामुळे त्यांना एवढा निवांतपणा मिळत नाही. मुलांना पुस्तकांच्या दुकानात घेऊन जा. त्यांच्या आवडीने पुस्तकाची खरेदी करा आणि ते पुस्तक त्यांना रोज थोडे थोडे वाचायला सांगा. मुलं सुरुवातीला वाचायचा कंटाळा करू शकतात. अशावेळी तुम्ही ते पुस्तक वाचा. अर्धी गोष्ट तुम्ही वाचायची आणि मुलांची उत्सूकता वाढली की उरलेली त्यांच्याकडून वाचून घ्यायची असं करत त्यांची वाचनाची आवड वाढवू शकता.
ॲल्युमिनियम कढई, डबे कळकट झाले? फक्त २ गोष्टी वापरून धुवा- आरशासारखे चकचकीत होतील...
४. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्या वेळी जमेल त्यावेळी मुलांना मैदानावर नक्की घेऊन जा. जवळपास मैदान नसेल तर मुलांना सोबत घेऊन दूर चालायला जा. यामुळे त्यांचा व्यायामही होईल आणि मोकळ्या हवेत फेरफटका मारून आल्याने थोडे फ्रेश वाटेल.