Lokmat Sakhi >Parenting > बाळासाठी परफेक्ट नाव कसं निवडायचं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं सोपं गणित, बाळाचं नाव ठेवणं होईल सोपं

बाळासाठी परफेक्ट नाव कसं निवडायचं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं सोपं गणित, बाळाचं नाव ठेवणं होईल सोपं

How to name a baby see what sadhguru jaggi vasudev says : आपल्या मुलांचे नाव ठेवण्याआधी पालकांनी विचार करायला हवा. कारण नाव ठेवणं एखाद्या टास्कप्रमाणे असते.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:16 PM2023-10-18T15:16:49+5:302023-10-18T15:30:48+5:30

How to name a baby see what sadhguru jaggi vasudev says : आपल्या मुलांचे नाव ठेवण्याआधी पालकांनी विचार करायला हवा. कारण नाव ठेवणं एखाद्या टास्कप्रमाणे असते.  

How to name a baby see what sadhguru jaggi vasudev says right way to choose name | बाळासाठी परफेक्ट नाव कसं निवडायचं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं सोपं गणित, बाळाचं नाव ठेवणं होईल सोपं

बाळासाठी परफेक्ट नाव कसं निवडायचं? सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं सोपं गणित, बाळाचं नाव ठेवणं होईल सोपं

आपल्या मुलाचं नाव युनिक असावं अशी प्रत्येक आईवडीलांची इच्छा असते. कारण  जन्मापासून मृत्यूपर्यंत नाव अशी एकच गोष्ट असते जी कायम सोबत राहते. मॉडर्न, सरळ  तितकंच खोल अर्थ असलेलं नाव असावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलांचे नाव ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. (How to name a baby see what sadhguru jaggi vasudev says)

आपल्या मुलांचे नाव ठेवण्याआधी पालकांनी विचार करायला हवा. कारण नाव ठेवणं एखाद्या टास्कप्रमाणे असते.  इशा फाऊंडेशनच्या पोर्टलवर प्रकाशित  करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये सद्गुरूंनी मुलांचे नाव कसे त्याच्या जीवनावर प्रभाव टाकते. याबाबत सांगितले आहे.

ध्वनीकडे लक्ष द्या

सद्गुरुंनी सांगितले की ध्वनी मानव प्रणालीवर प्रभाव टाकते. हे कोणच्याही नावाशी जोडलेले असू शकते.  म्हणून  साऊंड कॉम्बिनेशनकडे लक्ष द्यायला हवं. लहान मुलांसाठी नेहमी अशा नावांची निवड करा जे ऐकायला चांगले वाटेल आणि उच्चारतानाही छान वाटेल. 

रोज चालता तरी पोट १ इंचही कमी होत नाही? ५ चुका टाळा, वजन पटापट कमी होईल-फिट दिसाल

आवाजाचा परिणाम

आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाच्या आवाजाचा परिणाम आपल्यावर होतो. पर्वत असो किंवा  नदी, झाडं, दगड मानव शरीरासह सर्वांचाच एक वेगळा आवाज असतो. अशा प्रकारचे आवाज ऐकून पहिल्या महिन्यापासूनच मुलं प्रतिक्रिया देऊ लागतात.

नाद योग

सद्दगुरू यांनी नादयोगाबद्दलही सांगतिले त्यांनी सांगतले की,   योग्य प्रकारच्या आवाजात जीवन बदलण्याची क्षमता असते. साध्या शब्दात याला संगीत ध्यान असे म्हणतात. शरीर,  मन आणि आत्मा यांत ताळमेळ तयार होतो. 

दुपारच्या जेवणात काय खाता? ४ पदार्थ खाणं टाळा, अन्यथा पोट साफ व्हायला त्रास-वजनही वाढेल

संस्कृतचे महत्व

प्रत्येक भाषा ही चर्चा करण्याच्या उद्देषाने तयार करण्यात आलेली नाही. काही लोक आपल्या मुलांसाठी संस्कृतात नावं शोधतात. कारण संस्कृतात मुलां-मुलींच्या नावाचे योग्य अर्थ सापडतात. हे शब्द जास्त मोठे किंवा कठीण नसतात. सद्गुरू यांच्यामते आपल्या बाळाचे नाव असं काही ठेवा की जेव्हाही तुम्ही नावाने हाक मााराल तेव्हा त्याला आतून काहीतरी जाणवेल. 
 

Web Title: How to name a baby see what sadhguru jaggi vasudev says right way to choose name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.