जर तुम्हाला तुमच्या मुलांचा सर्वांगिण विकास हवा असेल तर तुम्ही मुलांचं एक टाईमटेबल सेट करायला हवं. यामुळे मुलांना शिस्त लागते. वेळेची किंमत कळते आणि मुलं टाईम मॅनेजमेंटसुद्धा शिकतात. टाईम टेबल हे मुलांच्या उठण्यापासून झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं असावं. ज्यामुळे ते फिजिकली आणि मेंटली स्ट्राँग राहतात. अभ्यास असो किंवा खेळ मुलांची ओव्हरऑलग्रोथ होते. मुलांचे टाईमटेबल बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी समजून घेऊ. (How to prepare time table of school going children)
प्रगतीपुस्तकानुसार वेळापत्रक
तुम्हाला मुलाचे शैक्षणिक वर्ष लक्षात घेऊन त्याचे वेळापत्रक तयार करावे. त्याच्या/तिच्या मागील रिपोर्ट कार्डनुसार वेळापत्रक सेट करा. तुमचा मुलगा ज्या विषयात कमकुवत आहे किंवा ज्यात त्याला मागच्या वेळी कमी गुण मिळाले आहेत त्या विषयांवर तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. यामुळे मुलाची चांगली सुधारणा होईल.
५ मिनिटांत काढा पट्टीची रांगोळी, पाहा डिझाइन -नवरात्रीत दारासमोर काढा सुरेख पाऊलं..
अभ्यासाप्रमाणे खेळासाठीही वेळ द्या
तुम्ही मुलाचे टाईम टेबल अशा प्रकारे सेट करा की त्याचा अभ्यास, खेळ, टीव्ही आणि फोन वापरण्याची वेळही ठरलेली असेल. याशिवाय वेळापत्रकात मुलाच्या छंदांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जसे की गाणे, नृत्य, चित्रकला, गिटार, पुस्तक वाचन इत्यादी.
पिरिएड्स संपल्यानंतर १० दिवस हे पदार्थ खा; भराभर कमी होईल चरबी, स्लिम दिसाल
फोन, टिव्हीपासून दूर ठेवा
शाळेतून आल्यानंतर तुमच्या मुलाला फोन, टीव्ही इत्यादीपासून दूर ठेवा. आधी त्याला खायला द्या, मग झोपा. या काळात तुम्ही तुमच्या मुलाला एखादी गोष्ट किंवा शाळेत काय घडले ते सांगू शकता; आपण याबद्दल बोलू शकता. मुलाशी असलेली ही संभाषणे तुम्हाला तुमच्या मुलाला चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत करतील.
याशिवाय मुलाच्या आठवड्याच्या सुट्टीच्या दिवसासाठी वेगळे वेळापत्रक ठेवा. या दिवशी आपल्या नित्यक्रमाचे वेळापत्रक पाळू नका. या दिवशी मुलांना थोडं कमी व्यस्त ठेवा. सुट्टीच्या दिवशी मुलाला खेळासाठी जास्त वेळ द्या, जेणेकरून मुल अभ्यासाला ओझे समजणार नाही. त्याच वेळी, आठवड्याच्या सुट्टीत, तुम्ही मुलाला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. जसे एखादे संग्रहालय, उद्यान किंवा कोणतीही ऐतिहासिक वास्तू दाखवा. त्यामुळे मुलाचे ज्ञान वाढेल.