Join us

सकाळी नाही तर 'या' वेळी मुलांच्या दातांना करा ब्रश, लागणार नाही कीड अन् राहतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:00 IST

How To Protect Kids Teeth : जास्तीत जास्त लहान मुलं रात्री दूध पितात, त्यामुळे त्यांच्या तोंडाला दूध लागलेलं असतं. ज्यामुळे दुधाच्या दातांमध्ये टूथ डीके ही समस्या होते.

How To Protect Kids Teeth : आजकाल लहान मुलांच्या दातांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. जवळपास प्रत्येक दुसऱ्या मुलाला दातांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. कुणाचे दात खुंटतात तर कुणाच्या दातांना कीड लागते. कारण काय तर वाढलेलं चॉकलेट आणि गोड खाण्याचं प्रमाण. त्यासोबतच दातांची बरोबर स्वच्छता न करणं. डॉक्टर सांगतात की, मुलांच्या दातांच्या समस्या होण्याचं मुख्य कारण मुलांना बॉटल फीड करणं. 

जास्तीत जास्त लहान मुलं रात्री दूध पितात, त्यामुळे त्यांच्या तोंडाला दूध लागलेलं असतं. ज्यामुळे दुधाच्या दातांमध्ये टूथ डीके ही समस्या होते. जास्त काळ तोंडात बॅक्टेरिया राहिल्यानं दातांना कीड लागते. जी दातांच्या इनॅमलवर हल्ला करते. यासाठी काय काळजी घ्यावी हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 

बेबी बॉटल डीके, ब्रेस्ट फीडिंग प्रॉब्लेम्स होणं कॉमन आहे. १५ ते १८ महिन्याच्या मुलांमध्ये दातांना कीड लागत आहे. याचं मुख्य कारण बेबी बॉटल फीड करणं मानलं जातं आहे. मुलांच्या तोंडाला आतून दूध लागलेलं राहतं. ज्यामुळे बॅक्टेरिया तयार होतात.

कधी करावा ब्रश?

एक्सपर्ट सांगतात की, मुलांचे दात खराब होऊ नये यासाठी त्यांचे दात दिवसातून दोन वेळा घासून द्या. जास्तीत जास्त लोक सकाळी आणि रात्री असे दोन वेळा ब्रश करवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. मुलांचे रात्री झोपण्याआधी दात स्वच्छ करून देणं चांगलं आहे. फण सकाळी ब्रश करवणं काही गरजेचं नाही. त्याऐवजी नाश्ता केल्यावर काही खाल्ल्यानंतर त्यांचे दात घासून द्या. 

एक्सपर्ट सांगतात की, मुलांनी जेव्हा जेव्हा काही खाल्लं असेल तेव्हा दात स्वच्छ केले पाहिजे. जर प्रत्येक वेळी ब्रश करू शकत नसाल तर दात पाण्यानं साफ करा. काहीही खाल्ल्यावर पाण्यानं गुरळा करण्यास सांगा. असं केल्यास दातांमधील अन्नाचे अडकलेले कण निघून जातील आणि दातांनी कीड लागणार नाही.

दातांची सुरक्षा कशी कराल?

- रात्री मुलं जेवल्यावर त्यांना दात घासण्याास सांगा

- जेव्हा ते काही गोड खातील तेव्हा त्यांना गुरळा करायला लावा

- मुलांना फ्लोराइड असलेल्या टूथपेस्टनं ब्रश करायला लावा

- जेवण केल्यावर ब्रश करण्याची सवय लावा

- दिवसातून एकदा मीठ आणि पाण्यानं गुरळा करायला सांगा

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स