Join us  

मुलांचं टीव्ही- मोबाईल बघणं कमी करण्याचा १ खास उपाय, स्वत:हून स्क्रीन टाइम कमी करतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2024 2:35 PM

How To Reduce Screen Time Of Kids: मुलांचं टीव्ही, माेबाईल बघणं कमी करण्यासाठी हा एक खास उपाय पाहा... (special tips and tricks to reduce mobile, tv addiction in kids)

ठळक मुद्देहा उपाय केल्यामुळे अगदी आठवडाभरातच मुलांचं स्क्रीन बघणं बऱ्यापैकी कमी झाल्याचा अनुभव एका आईने सांगितला आहे.

हल्ली बहुतांश पालकांची हीच तक्रार असते की त्यांची मुलं खूप जास्त वेळ टीव्ही, मोबाईल पाहात बसतात. सुटीमध्ये तर मुलांचा अधिकाधिक वेळ टीव्ही, मोबाईल पाहण्यात गेला असल्याचा अनुभव कित्येक पालकांनी घेतलेला आहेच. मुलांचा असा वाढता स्क्रीन टाईम त्यांच्या आरोग्यावर, अभ्यासावर निश्चितच वाईट परिणाम करणारा आहे. त्यामुळेच मुलांचं टीव्ही, मोबाईल बघणं कमी करण्यासाठी हा एक खास उपाय करून पाहा (how to reduce screen time of kids). हा उपाय केल्यामुळे अगदी आठवडाभरातच मुलांचं स्क्रीन बघणं बऱ्यापैकी कमी झाल्याचा अनुभव एका आईने सांगितला आहे. (special tips and tricks to reduce mobile, tv addiction in kids)

 

मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्याचा उपाय

मुलांचं टीव्ही, मोबाईल बघणं कसं कमी करावं, याविषयीचा स्वत:चा अनुभव एका आईने schweta.happyminds या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये जो उपाय सांगण्यात आलेला आहे तो उपाय इतरांसाठीही नक्कीच उपयोगी ठरणारा आहे.

चेहऱ्याला लावा ४ घरगुती पदार्थांपासून तयार केलेलं ब्लीच- डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन होईल कमी

त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी त्यांनी पॉडकास्टचा वापर सुरू केला. पॉडकास्टद्वारे मुलांना वेगवेगळ्या गोष्टी ऐकवल्या. मुलांच्या आवडीनुसार, छंदानुसार वेगवेगळे विषय त्यांना ऐकायला दिले. यामुळे मुलं हळूहळू ते ऐकण्यात रमून गेली. सुरुवातीला एकदम मुलांना ते आवडलं नाही. पण हळूहळू त्यांच्या इंटरेस्टचे विषय शोधून दिल्यावर मुलांना ते आवडायला लागलं. यामुळे मुलांची कल्पना शक्ती वाढली. एका जागी शांत बसून ऐकण्याची क्षमता वाढली तसेच एकाग्रताही वाढली असं त्यांनी सांगितलं आहे.

 

तुम्हाला पॉडकास्टचा पर्याय आवडला नसेल तर किंवा तुमच्याकडे मुलांना देण्यासाठी पुरेसा वेळ असेल तर तुम्ही त्यांना गोष्टी सांगण्याचा किंवा वाचून दाखविण्याचाही पर्याय निवडू शकता.

रणबीर कपूर म्हणाला लहानपणी 'हा' होता करिना- रिधीमाचा आवडीचा खेळ, आणि त्यात मी नेहमीच.... 

गोष्टी ऐकल्याने मुलांना खूप फायदे होतात. एकाग्रता, विचारशक्ती, कल्पनाशक्ती वाढते. याचा त्यांच्या अभ्यासावरही निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी एकदा पॉडकास्ट किंवा मग स्वत: गोष्ट सांगणे असा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइल