Lokmat Sakhi >Parenting > गणित मुलांच्या डोक्यावरुन जातं? ५ टिप्स-मुलांना लागेल गणिताची गोडी- मिळतील पैकीच्या पैकी मार्क

गणित मुलांच्या डोक्यावरुन जातं? ५ टिप्स-मुलांना लागेल गणिताची गोडी- मिळतील पैकीच्या पैकी मार्क

How to Score Good Marks in Maths : मुलांमध्ये या ५ महत्वाच्या गोष्टीतून गणिताची गोडी निर्माण करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 10:00 AM2024-03-28T10:00:00+5:302024-03-28T10:00:01+5:30

How to Score Good Marks in Maths : मुलांमध्ये या ५ महत्वाच्या गोष्टीतून गणिताची गोडी निर्माण करा..

How to Score Good Marks in Maths? | गणित मुलांच्या डोक्यावरुन जातं? ५ टिप्स-मुलांना लागेल गणिताची गोडी- मिळतील पैकीच्या पैकी मार्क

गणित मुलांच्या डोक्यावरुन जातं? ५ टिप्स-मुलांना लागेल गणिताची गोडी- मिळतील पैकीच्या पैकी मार्क

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्याकडून अभ्यास करवून घेणं गरजेचं आहे. कारण काही मुलं स्वताहून अभ्यासाला बसतील असे नाही. बऱ्याचदा मुलांना इतर विषय आवडतात, पण गणित हा विषय त्यांना फारसा आवडत नाही (Mathematics Subjet). गणिताचा कोडे सोडवताना त्यांची दमछाक उडते (Maths). परंतु, काही मुलांना गणित शिकवणे सोपे जाते. मुलांना गणित शिकवताना फक्त पेन, पेन्सिल आणि कागदाची गरज नसून, मनोरंजन शैलीत आपण त्यांना गणित शिकवू शकता.

अनेक मुलांना गणित हा विषय कंटाळवाणे वाटते(Teaching Tips). पाढे, फोर्म्युले, यासह इतर गोष्टी लक्षात ठेवणं अवघड जाते (Parenting Tips). पण मुलांची अभ्यासात गोडी लागावी; यासह त्यांना गणित या विषयात चांगले गुण मिळावे असे वाटत असेल तर, छोट्या छोट्या गोष्टी शिकवा. यामुळे मुलं हसत-खेळत गणित शिकतील(How to Score Good Marks in Maths?).

बेसिक क्लिअर करा

थॉट को डॉट के. या वेबसाईटनुसार, 'मुलांना गणित शिकवण्यापूर्वी त्यांचा बेस क्लिअर करा. बेसिक फंडामेंटल्स क्लिअर केल्याने मुलांना गणित शिकणं सोपे होईल. त्यांना घरातील काही उदाहरण देऊन शिकवा. गणित शिकवताना घरातल्या काही गोष्टींचा वापर करा. यामुळे मुलाचं बेसिक क्लिअर होईल. शिवाय मेमरी पॉवर देखील वाढेल.

मूत्रपिंडाचे विकार टाळा, प्या एक आयुर्वेदिक काढा! किडनी डिटॉक्सचा सोपा घरगुती उपाय

बेरीज

मुलांना गणित शिकवताना बेरीजपासून शिकवायला सुरुवात करा. यासाठी सुरुवातीला फळे आणि भाज्या एकत्र ठेवा आणि मुलाला एक-एक करून वेगळे करण्यास सांगा. असे केल्याने मुलं फळे आणि भाज्यांमधील फरक ओळखतील. त्यानंतर काउंट करायला सांगा. यामुळे आवडीने मुलं बेरीज शिकतील.

खेळातून मुलांना गणित शिकवा

मुलांना शिकवण्यासाठी असे अनेक खेळ बाजारात उपलब्ध आहेत, जे त्यांना गणित शिकवण्यात मदत करतील. पालक या खेळांची मदत घेऊ शकतात. आपण त्यांना साप-शिडी देखील खेळायला देऊ शकता. यामुळे मुलं बेरीज शिकतील. शिवाय १ ते १०० संख्या देखील पाठ होईल.

मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

ॲबॅकसमुळे वाढेल इंटरेस्ट

मुलांना वस्तूंशी खेळायला आवडते. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण अशा कोणत्याही आकाराच्या वस्तूंशी ते तासंतास खेळू शकतील. अशावेळी मुलांना ॲबॅकसचा वापर करून त्यांना मोजणे, बेरीज आणि वजाबाकी शिकवता येईल.

प्रॅक्टिकल गोष्टी शिकवा

मुलं कोणतीही थेअरी शिकताना बराच वेळ घेतात. त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल शिकवणही द्या. प्रॅक्टिकली पालक मुलांना गणित शिकवू शकतात. व्यावहारिक शिक्षणाद्वारे मुले मोजणी, टेबल्स शिकू शकतात. आजकाल शाळांमध्येही व्यावहारिक शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यामुळे मुलांना बाजारात घेऊन जा. त्यांना खरेदी करताना लक्ष ठेवण्यास सांगा. घरातल्या लहान-सहान गोष्टी आणायला सांगा. 

Web Title: How to Score Good Marks in Maths?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.