बहुतांश पालकांची एकच तक्रार असते (Parenting Tips). ती म्हणजे रात्रीचं मुल लवकर झोपत नाही (Sleeping). रात्रीचे १ जरी वाजले तरी, ते दिवसा खेळतात तसे, जागे असतात. साधारणपणे रात्री उशिरापर्यंत झोपण्याची सवय ही पालकांमुळे निर्माण होते (Sleeping Tips). घरातील वातावरणामुळे मुलांना उशिरा झोपण्याची सवय लागते (Child Care). पण सवय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
जर लहान मुलांना लवकर झोपण्याची सवय लागावी असे वाटत असेल तर, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मोनिका सिंग यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. त्यांनी या टिप्स व्हिडिओद्वारे शेअर केल्या असून, यामुळे मुलांना कसा फायदा होईल. हे देखील सांगितलं आहे(How to sleep better: 5 tips for children and teenagers).
घरातील दिवे बंद करा
तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी खोलीमध्ये आरामदायी वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. नंतर पालकांनी लवकर झोपण्याचं नाटक करायला हवं. घरातील सर्व दिवे बंद करा. मुलांना झोपायला घेऊन जा आणि झोपायची वेळ झाली आहे हे सांगा. यामुळे मुलांना लवकर झोप लागेल.
झोपण्याचे नाटक करा
दिवे बंद केल्यानंतर झोपण्याचं नाटक करा. जेणेकरून मुलांना समजेल पालक थकले आहेत, आणि त्यांना झोपायचं आहे. नंतर त्यांच्याजवळ तुम्हीही झोपा. शक्यतो मुलांसमोर मोबाईल फोन वापरणं टाळा. मुलं झोपेपर्यंत आपणही एक हलकी डुलकी घेऊ शकता.
मोबाईल फोनचा वापर टाळा
झोपण्यापूर्वी मुलांसमोर मोबाईल फोन आणि टीव्हीचा वापर टाळा. यामुळे मुलांचीही झोप मोड होऊ शकते. शिवाय खिडक्यांवर पडदे लावा. जेणेकरून बाहेरून आत प्रकाश येणार नाही. अंधार खोलीमुळे मुलांना लवकर झोप येईल.
नियमित ही गोष्ट करा
मुलांना पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी लवकर झोपण्याची सवय लागणार नाही. नियमितपणे त्यांना लवकर झोपण्याची सवय लावा.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
सयंम बाळगा
आठवडाभर मुलांना लवकर झोपायला लावल्याने, त्यांच्यामध्ये ही सवय निर्माण होईल. या सवयीमुळे मुलांना लवकर झोप येईल. त्यामुळे पालकांनी थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे, मुलाला आपोआप लवकर झोपण्याची सवय लागेल.