Join us  

फाडफाड इंग्रजी बोलण्यासाठी खास ४ ट्रिक्स, मनातून भीती जाईल-मुलेही बोलू लागतील पटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2024 6:38 PM

How To Speak English Fluently: 4 Powerful Tips And Tricks : आपल्या मुलांनी फाडफाड इंग्रजी बोलावे असे वाटत असेल तर, एकदा या ४ ट्रिक्सकडे नजर टाकाच..

इंग्रजी ही ग्लोबल भाषा आहे. कुठल्याही देशात गेल्यास इंग्रजी भाषेमुळे बोलणे आणि संवाद साधणे सोपे होते. भारतातही संवाद साधताना इंग्रजी भाषेचा वापर होतो. शिवाय काही शाळांमध्ये इंग्रजी ही भाषा शिकवली जाते. इंग्रजीचे वाचन, लिखाण व व्याकरण यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचं आहे. काही शाळांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम हा इंग्रजी भाषेत असतो. पण इंग्रजी माध्यमात शिकूनही काहींना इंग्रजी ही भाषा बोलायला जमत नाही. किंवा अडचण निर्माण होते.

कँब्रीज इंग्लिश या वेबसाईटनुसार, 'काही मुलांना इंग्रजी भाषेत संवाद साधताना अडचण निर्माण होते. काही मुलं खूप लाजाळू असतात. आपण इंग्रजी बोलताना चुकणार तर नाही ना, ही भीती त्यांना सतावत असते. शाळेमध्ये विद्यार्थी इंग्रजी ही भाषा बोलायला शिकतोच. पण घरात सकारात्मक वातावरण निर्माण करून आपणही त्यांना इंग्रजी ही भाषा शिकवू शकतो'(How To Speak English Fluently: 4 Powerful Tips And Tricks).

स्वतः मुलांसोबत इंग्रजी बोला

काही मुलं इंग्रजी बोलताना कॉण्फिडेण्ट नसतात. जर त्यांना इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधताना अडचण निर्माण होत असेल तर, स्वतः त्यांच्यासोबत इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधा. असं केल्याने त्यांच्या मनातील भीती कमी होईल. शिवाय त्यांचा मनोबल वाढेल.

नियमित ३ गोष्टी खा, दात चमकतील मोत्यासारखे! पिवळ्या पडलेल्या दातांसाठी सोपा उपाय

डिक्शनरी

भाषा शिकताना वाचन देखील करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण त्यांना वर्तमानपत्र किंवा डिक्शनरी वाचण्याचा सल्ला देऊ शकता. यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढेल. शिवाय न घाबरता इंग्रजी बोलायलाही शिकतील.

वारंवार अडवू नका

माणूस आहे चुका होणार, पण मुलं चुकत असताना त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न करू नका. कारण चुकीमधूनच माणूस शिकत असतो. त्यांना चुकू द्या. वारंवार चूक सुधारल्याने त्यांच्यामधील शिकण्याची वृत्ती कमी होऊ शकते. मुलं जर वारंवार एकच चूक करत असतील तर, चूक सुधारा.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

कॉमिक्सची पुस्तकं वाचायला द्या

मुलांना कॉमिक्स आणि कार्टूनची पुस्तके वाचण्याची आवड असते. त्यांना इंग्रजी भाषेतील पुस्तकं वाचायला द्या. यामुळे मुलं चित्र पाहून इंग्रजी भाषा आवडीने शिकतील.

टॅग्स :पालकत्वविद्यार्थी