Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी हट्ट केला की पारा चडतो-चिडचिड होते? ५ गोष्टी करा, मन शांत राहील-मुलं त्रास देणार नाही

मुलांनी हट्ट केला की पारा चडतो-चिडचिड होते? ५ गोष्टी करा, मन शांत राहील-मुलं त्रास देणार नाही

How to Stay Calm Even If Children Are Making You Angry : खेळण्यावरून तर कधी वस्तूंवरून वेगवेगळ्या गोष्टींवरून भांडण्याची मुलांची तयारी असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 02:29 PM2024-04-11T14:29:14+5:302024-04-11T14:41:49+5:30

How to Stay Calm Even If Children Are Making You Angry : खेळण्यावरून तर कधी वस्तूंवरून वेगवेगळ्या गोष्टींवरून भांडण्याची मुलांची तयारी असते.

How to Stay Calm Even If Children Are Making You Angry : How Mothers Can Keep Themselves Calm | मुलांनी हट्ट केला की पारा चडतो-चिडचिड होते? ५ गोष्टी करा, मन शांत राहील-मुलं त्रास देणार नाही

मुलांनी हट्ट केला की पारा चडतो-चिडचिड होते? ५ गोष्टी करा, मन शांत राहील-मुलं त्रास देणार नाही

मुलं अनेकदा आईवडीलांना खूप त्रास होईपर्यंत वागतात. (Health Tips) कधी वेळेवर जेवत नाहीत तर कधी कारण नसताना कोणत्याही गोष्टींसाठी हट्ट करत असतात. खेळण्यावरून तर कधी वस्तूवरून वेगवेगळ्या गोष्टींवरून भांडण्याची मुलांची तयारी असते. अशा स्थितीत ओरडल्याने किंवा रागावल्याने आई-वडीलांवर ताण-तणाव येतो. जे तब्येतीसाठी अजिबात चांगले नसते. (How Mothers Can Keep Themselves Calm)

याशिवाय मुलांना वारंवार ओरडा ऐकवा लागतो. म्हणून आईनं स्वत:ला शांत ठेवणं फार महत्वाचे असते. काही सोप्या टिप्स वापरून  आई स्वत:ला शांत ठेवू शकता. मुलांना सतत बोलून बोलून आईची चिडचिड होते हे अगदी स्वाभाविक आहे पण तरिही काही गोष्टींची आधीच काळजी घेतली तर मुलांवर चिडचीड होणार नाही. (How to Stay Calm Even If Children Are Making You Angry) 

आईनं स्वत:ला शांत कसे ठेवावे?

विश्रांतीचा अभाव फ्रस्ट्रेशनचं कारण  ठरतो जर तुम्हाला पुरेपूर आराम मिळाला नाही तर तुम्हाला इरिटेट होऊ शकते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा राग  येऊ शकतो. म्हणून स्वत:साठी वेळ काढून खा-प्या, फिरून या किंवा एखाद्या खोलीत आराम  करा. दुपारच्यावेळी वेळ मिळाल्यास विश्रांती घ्या. 

अंग दुखतं- कॅल्शियम कमी झालंय? उन्हाळ्यात ५ पदार्थ खा; बळकट हाडांसाठी भरपूर कॅल्शियम

आधी परिस्थिती समजून घ्या

जर अचानक मुलं काही चुकीचे काम करताना दिसले त्यांच्या हातातून एखादं भांडं पडलं तर रागावण्याआधी त्याचं पूर्ण म्हणणे ऐकून घ्या. मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याआधी त्यांच्यावर रागवू नका. त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी करायला सांगा.

ओरडण्याऐवजी सोल्यूशन शोधा

अनेकदा मुलं कामं वाढवून ठेवतात तेव्हा त्यांचे आईवडील त्यांच्यावर रागवतात. पण मुलांनी ओरडण्याऐवजी काम बिघडवलं ते तर त्यांच्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करा. त्यांना त्याच्या चुका समजावून सांगा.
रागवण्याच्या परिणामांबाबत विचार करा.

रोज पोटभर भात खाल तरी शुगर कंट्रोलमध्ये राहील; डायबिटीसशी लढतात 'या' ६ प्रकारचे तांदूळ

अनेकदा आई वडीलांच्या रागाचा मुलांवर चुकीचा परिणाम होतो. मुलांना  बाहेर जाण्याची खूप उत्सुकता असेल अशावेळी तुम्हाला उशीर होत असेल तर मुलांची चिडचिड होऊ शकते. अशावेली उलट मुलांना रागवण्याआधी विचार करा. 

Web Title: How to Stay Calm Even If Children Are Making You Angry : How Mothers Can Keep Themselves Calm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.